घरताज्या घडामोडीखुशखबर! मुंबईसह या राज्यात सिलेंडर झाले स्वस्त, जाणून घ्या नवे दर

खुशखबर! मुंबईसह या राज्यात सिलेंडर झाले स्वस्त, जाणून घ्या नवे दर

Subscribe

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढवण्यात आला. या लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना अनेक समस्या सामोरे जावे लागत आहे. त्यापैकी एक समस्या ही एलपीजी गॅल सिलेंडरची आहे. लॉकडाऊन असल्यामुळे सिलेंडर घरपोच होत नसल्या कारणाने लांबच लांब रांग लावून कित्येक तास थांबून सिलेंडर घ्यावा लागत आहे. दरम्यान एलपीजी सिलेंडरच्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. आजपासून विना अनुदानित एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला आहे. राजधानी दिल्लीत एलपीजी सिलेंडर १६२.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. म्हणजेच आजपासून दिल्लीत ५८१.५० रुपयात सिलेंडर मिळेल. यापूर्वी ७४४ रुपये या सिलेंडरकरिता मोजावे लागत होते. वेगवेगळ्या राज्यात टॅक्सनुसार दरात बदल लागू करण्यात आला आहे. तेल कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीचा आढावा देतात.

मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत ५७९ रुपये झाली असून पूर्वी ७१४ रुपये होती. कलकत्तामध्ये १९० रुपयांची कपात करण्यात आली असून आता ५८४.५० रुपयांना सिलेंडर उपलब्ध होणार आहे. चेन्नईत सिलिंडरची किंमत ७६१ वर ५६९.५९ रुपये झाली आहे.

- Advertisement -

विना अनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत (१४.२ किलो)

१ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत

- Advertisement -

यापूर्वीच्या सिलेंडरच्या किंमती

१९ किलो गॅस सिलेंडरची पूर्वीची किंमत

मागील महिन्यात देखील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत घसरण झाली होती. सलग तिसऱ्या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमती कमी झाल्या आहेत. यामुळे देशातील १.५ कोटी ग्राहकांना फायदा होणार आहे.


हेही वाचा – धक्कादायक! भावाला विहिरीत फेकून तरुणीवर केला सामुहिक बलात्कार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -