घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023विरोधकांनी चक्क विधानसभेच्या पायऱ्यांवरच मांडली चूल, 'या' घोषणांनी लक्ष वेधले

विरोधकांनी चक्क विधानसभेच्या पायऱ्यांवरच मांडली चूल, ‘या’ घोषणांनी लक्ष वेधले

Subscribe

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसऱ्या आठवड्यातील चौथा दिवस आहे. अधिवेधनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या प्रश्नांवरून घेरण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यावरून विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवर करत असलेले अनोखे आंदोलन देखील चर्चेत आले आहेत. आज विरोधकांनी तर चक्क विधानसभेच्या पायऱ्यांवरच चूल मांडली. गॅस दरवाढ आणि वाढती महागाई या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले.

केंद्र सरकारने घरगुती गॅसची किंमत ५० रुपये आणि व्यावसायिक गॅसची किंमत ३५० रुपये वाढवल्याने आता १४ किलो घरगुती गॅसची किंमत ११०३ रुपये झाली आहे तर १९ किलो व्यावसायिक गॅसची किंमत २११९ रुपये इतकी झाली आहे. या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे महागाई मुळे कंबरडे मोडले आहे. याचाच निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी चक्क विधानभवनाच्या पायऱ्यांवर चूल मांडत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले. गॅसच्या वाढत्या दरामुळे ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी पुन्हा चुली पेटवण्याची वेळ येणार असल्याचं दाखवत आमदारांनी चूल रचण्यासाठीचे सर्व साहित्य आणले होते. एकेएकाने हे सर्व साहित्य एकावर एक रचून चूल मांडली. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

“या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय…, खाटी अनुदान न देणाऱ्या, एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणऱ्या सरकारचा धिक्कार असो…, खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बटेज कोलमडले,…, बजेटमध्ये भोपळा देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…महागाई वाढवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…अशा वेगवेगळ्या घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी हे आंदोलन केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -