घरCORONA UPDATELockdown Breaking: आता रेड झोनमध्येही दारू विक्रीला परवानगी, पण...

Lockdown Breaking: आता रेड झोनमध्येही दारू विक्रीला परवानगी, पण…

Subscribe

राज्यातील तळीरामांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. कारण रेड झेनमधील अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्या दुकांनाना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे सारख्या रेड झोनमध्ये आता वाईन्स शॉप्स खुले केले जाणार आहेत. मात्र कटेंनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर दुकांनाना परवानगी देण्यात आलेली नाही. राज्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने म्हटले आहे की, मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वगळता इतर ठिकाणी स्वतंत्र असलेल्या रेड झोनमधील वाईन्स शॉप्सना परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र रेड झोनमध्ये जिथे कटेंनमेंट झोन आहे, तिथे मात्र वाईन्स शॉप्स चालू करता येणार नाहीत. तसेच रेड झोनमध्ये पाच अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकांनाना देखील उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. प्रत्येक ओळीतील फक्त पाच दुकांनाना उघडण्यात येईल. मात्र अत्यावश्यक सेवेतील दुकांनाना कोणतीही मर्यादा नसेल.

कोणत्या भागात काय चालू राहणार?

महाराष्ट्र सरकारने एक पत्रक काढून कोणत्या विभागात काय चालू राहणार याची यादी दिली आहे. यामध्ये कटेंनमेंट झोनमध्ये काही गोष्टींवर निर्बंध कायम ठेवले असले तरी रेड झोनमध्ये अनेक गोष्टी खुल्या करण्यात आलेल्या आहेत.

- Advertisement -


वाचा – रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन म्हणजे काय? तिथे काय चालू आणि बंद राहणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -