Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई शिवजयंतीसाठी गृह विभागाची नियमावली; साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन

शिवजयंतीसाठी गृह विभागाची नियमावली; साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने माघी गणेशोत्सवाच्या पाठोपाठ शिवजयंतीसाठी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन यंदा शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. पुढील आठवड्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजून ओसरलेला नाही. कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेऊन गृह विभागाने नियमावली तयार केली आहे.

शिवजयंती गड किल्ल्यावर साजरी न करता ती घरातच साधेपणाने साजरी करावी. जयंती उत्सवावेळी १० पेक्षा जास्त लोकांनी उपस्थित राहू नये. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. सदर कार्यक्रमांचे आयोजन ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी, असे गृह विभागाने म्हटले आहे.

- Advertisement -

प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अथवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना अंतर नियमांचे पालन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत व आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत नागरिकांनाही तसे आवाहन करावे, असे गृह विभागाने नमूद केले आहे.

- Advertisement -