Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई क्षणार्धात झाले होत्याचे नव्हते, धूपामुळे लागलेल्या आगीत घर भस्मसात

क्षणार्धात झाले होत्याचे नव्हते, धूपामुळे लागलेल्या आगीत घर भस्मसात

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही

Related Story

- Advertisement -

वसईत गुरुवारी संध्याकाळी ६.३० वाजता एव्हरशाईन परिसरात घरात धुपाने पेट घेतल्यामुळे आग लागली. धुपाला लागलेल्या आगीने अचानक पेट घेतल्याने लागलेल्या आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले आहे. ही आग इतकी भीषण होती की विझव्यापूर्वीच क्षणार्धात रौद्ररुप घेतल होते. त्यामुळे धुप पेटवताना आणि पेटवल्यानंतर योग्य ती काळजी नाही घेतली तर काय प्रसंग निर्माण होईल याची प्रचिती आता पाहायला मिळाली आहे. धुपाने पेट घेतला आणि आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घरच खाक केले आहे. घराच्या खिडकीतुन या आगीच्या ज्वाळा उंचच उंच झेपावताना पाहायला मिळाल्या होत्या. हि घटना वसईच्या एव्हरशाईनमधील स्टार रेसिडेन्सिमधली आहे. इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील घरात आग लागली होती.

धुपामुळे लागलेल्या आगीत घर भस्मसात झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार घरातील मंडळींनी देवाऱ्यात धूप लावला होता. परंतु या धूपाने अचानक पेट घेतला आणि संपूर्ण घरातील सामानने पेट घेतला. आगीत घरातील सर्व फर्निचर आणि सामान जळून खाक झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा: राज्यपालांचा विमानातून पायउतार, ठाकरे सरकारचा प्री-प्लॅन

अचानक लागलेल्या आगीत कुटूंबीयांचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाने तात्काळ पाचारण केले. आग ७ व्या मजल्यावर लागल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चांगलीच दमछाक झाली. परंतु शर्थीच्या प्रयत्नांनतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला यश आले आहे.

- Advertisement -