घरताज्या घडामोडीकंगना रनौत प्रकरणी आयुक्तांना नोटीस, अडचणी वाढणार?

कंगना रनौत प्रकरणी आयुक्तांना नोटीस, अडचणी वाढणार?

Subscribe

महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोगाच्या पॅनेलची BMC आयुक्तांना नोटीस पाठवली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्या मुंबईतल्या कार्यालयावर सप्टेंबर महिन्यांत महापालिकेचा हातोडा पडला होता. कंगनाचे ऑफिस अनधिकृत असल्याचे सांगून कारवाई करण्यात आली होती. आता याच पार्श्वभूमीवरून महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोगाच्या पॅनेलने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना नोटीस बजावली आहे. इकबाल चहल यांना २० जानेवारी २०२१ला महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोगाच्या पॅनेल समोर हजर राहण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

यापूर्वी कंगना रनौतच्या मुंबई कार्यालयावर झालेले बीएसीची कारवाई मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरवली होती. आता या कारवाईमुळे मुंबई महापालिका आयुक्तांची अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोगाच्या पॅनेलने महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली असून २० जानेवारी २०२१ला पॅनेल समोर हजर राहण्यास सांगितले आहे.

वांद्र्यातील पाली हिल येथील कंगनाच्या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकामाबाबत महापालिकेने नोटीस बजावून कार्यालय सील करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने कंगनाला दिलेली २४ तासांची मुदत ९ सप्टेंबरला संपल्यानंतर महापालिकेच्या पथकाने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे या कारवाईबद्दल तक्रार करण्यात आली होती. आता या तक्रारीची दखल महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कंटेन्मेंट क्षेत्राबाहेर वॉटर स्पोर्ट्स, नौका विहारास परवानगी; राज्य सरकारचा निर्णय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -