घरमुंबईकल्याणमधील मंगल राघोनगर परिसरातील नाला धोकादायक

कल्याणमधील मंगल राघोनगर परिसरातील नाला धोकादायक

Subscribe

कल्याणमधील मंगल राघोनगर परिसरातील नाला धोकादायक असून जिवीत हानी होण्याची शक्यता दिसून येत आहे.

मुंबई उपनगरातील गोरेगाव पूर्वे कडील आंबेडकर चौक या भागातील चाळीत राहणारा चिमुरडा एका नाल्यात रात्री वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नाल्यावर कसल्याही प्रकारचे संरक्षण झाकण नसल्याने बालक वाहून गेल्याची घटना घडली आहे. अशाच प्रकारची दुर्घटना कल्याणमधील मंगल राघोनगर प्रभागातील भर नागरी वस्तीत असलेल्या या उघड्या नाल्यातही केव्हाही होऊ शकते, अशा प्रकारची स्थिती सध्या या नाल्याची झाली आहे. सुमारे पाच ते सहा फुट रुंद आणि तितकीच खोली असलेल्या या नाल्यावरील अनेक कव्हर्स तुटल्यामुळे पावसाचा जोर वाढून पाणी साचल्याने एखादी व्यक्ती नाल्यात पडून वाहून जाऊ शकते.

नाला उघड्या अवस्थेत

कल्याणमधील मंगल राघोनगर प्रभागातील भर नागरी वस्तीत असलेला नाला उघडा पडला आहे. हा नाला उघडा नसल्याने या नाल्यात एखादी व्यक्ती पडून वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पावसाचा जोर वाढल्यामुळे पावसाचे पाणी नाल्याच्या वरून वाहत असते. त्यामुळे हा नाला नक्की कोणत्या ठिकाणी खुला आहे हे त्या मार्गाने ये जा करणाऱ्या नागरीकांना समजून येत नाही. अशा प्रकारच्या या धोकादायक नाल्यामुळे परिसरातील नागरीकांसह बालकांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. या नाल्याच्या सुरुवातीच्या काही भागाची पावसाळ्यापूर्वी महापालिकेने दुरुस्ती केली आहे. त्यामुळे या नाल्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त वाढल्याने नाल्याची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत नाल्यात वाहून गेला चिमुरडा!

हेही वाचा – नाला तुंबलाय? ‘अॅप’वरून कळवा

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -