घरमुंबईमुंबईकरांनो, दादरमधील हे रस्ते वर्षभर वाहतुकीसाठी बंद; पाहा कोणत्या मार्गाने करू शकता प्रवास

मुंबईकरांनो, दादरमधील हे रस्ते वर्षभर वाहतुकीसाठी बंद; पाहा कोणत्या मार्गाने करू शकता प्रवास

Subscribe

दादर येथील भूमीगत मेट्रो स्टेशनसाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने याचा थेट वाहतुकीवर परिणाम होणार आहे. मुंबई पोलिसांनी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, 2024 पर्यंत हे वाहतुकीचे नियम लागू असणार आहेत.

मुंबई शहरात व उपनगरात मेट्रोच्या कामांसाठी दादरमधील काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. मेट्रो 3 चे काम वेगात सुरु करण्यात आले आहे. दादर येथील भूमीगत मेट्रो स्टेशनसाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने याचा थेट वाहतुकीवर परिणाम होणार आहे. मुंबई पोलिसांनी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, 2024 पर्यंत हे वाहतुकीचे नियम लागू असणार आहेत.

मेट्रोच्या कामामुळे गोखले रोडवरील कै. अण्णा टिपणीस चौक ( स्टिलमॅन जंक्शन) ते गडकरी चौकपर्यंतच्या वाहतुकीवर परिणाम होईल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी या मार्गावरील वाहतूक इतरत्र ठिकाणी वळवण्यात येणार आहे. 29 मार्च 2023 ते 21 मार्च 2024 पर्यंत हे नियम लागू असणार आहेत. म्हणजेच जवळपास वर्षभर वाहतूक या मार्गांवर बंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

गडकरी जंक्शन ते कै. अण्णा टिपणीस चौक ( स्टीलमॅन जंक्शन) पर्यंत उत्तरेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला 24 तास वाहने उभी करता येणार नाही. हे क्षेत्र पोलिसांनी नो पार्किंग करण्यात आले आहे.

( हेही वाचा: राम नवमी साजरी करण्याचे आदेश देऊन ‘हिंदू जननायक’ परदेश दौऱ्यावर, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला )

- Advertisement -

रानडे रोड या मार्गावरील सेनापती बापट पुतळा चौक येथून स्टिलमॅम जंक्शनकडे येण्याकरता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. म्हणजेच रानडे रोड हा मार्ग स्टिलमॅन जंक्शनकडून सेनापती बापट पुतळा चौकाकडे जाण्यासाटी वन-वे मार्ग असेल.

पोर्तुगीज चर्चकडून गोखले रोड उत्तरेकडून येणाऱ्या वाहतुकीसाठी कै. अण्णा टिपणीस चौक ( स्टिलमॅन जंक्शन) येथून डावे वळण घेऊन पुढे न्यायमूर्ती रानडे रोड, दादासाहेब रेगे मार्गाने गडकरी जंक्शन येथे आल्यानंतर ( स्टिलमॅन जंक्शन ) येथून उजवे वळण घेऊन पुढे न्यायमूर्ती रानडे रोड, पानेरी जंक्शन, डावे वळण, एन.सी केळकर मार्गाने कोतवाल गार्डन येथून दादर टी.टी कडे वळतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -