घरमुंबईअतिधोकादायक इमारतींचा म्हाडाला विसर

अतिधोकादायक इमारतींचा म्हाडाला विसर

Subscribe

दर वर्षी मुंबई, ठाणे आणि लगतच्या परिसरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात येते. यानंतर इमारतीतील लोकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. त्यानुसार मुंबई महानगर पालिकेने नुकतेच सर्वेक्षण करून ६१९ इमारतींची अतिधोकादायक यादी जाहीर केली आहे. मात्र पावसाळा तोंडावर येऊनसुध्दा म्हाडाकडून मुंबई शहर बेटावरील सेझ, धोकादायक, अतिधोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणाचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे.

उशीरा केलं सर्वेक्षण

- Advertisement -

दरवर्षी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून मुंबई शहर बेटावरील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेर्क्षणानंतर निवासी भाडेकरू आणि रहिवाशी यांची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली जाते. काही रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले जाते. ही सर्व प्रक्रिया पावसाळ्यापूर्वी केली जाते. यासाठी साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वेक्षण केले जाते.

सेझ इमारतींचे अद्याप सर्वेक्षण नाही

- Advertisement -

मात्र यावर्षी पावसाळा तोंडावर आला असतानाही म्हाडाने धोकादायक आणि अतिधोकादायक सेझ इमारतींचे सर्वेक्षण केलेले नाही. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, हे सर्वेक्षण फक्त पावसाळ्यापूर्वी न करता सातत्याने सुरू ठेवले पाहिजे. असे असतानाही म्हाडाने आपल्या अखत्यारित असलेल्या सेझ इमारतींचे अजूनही सर्वेक्षण केलेले नाही.

यंदाच्या वर्षी म्हाडाचे दुर्लक्ष

गेल्यावर्षी म्हाडाने मे महिन्यात सर्व्हे करून ९ इमारती अतिधोकादायक घोषित केल्या होत्या. एम.जी. रोड, एक्स्प्लेनेड मेंशन, काझी सय्यद स्ट्रीट, नागदेवी क्रॉस लेन, काझी स्ट्रीट, मस्जिद स्ट्रीट, बारा इमाम रोड, के.एम. शर्मा मार्ग, दुसरी सुतार गल्ली, चौपाटी, सी फेस, लकी मेन्शन, क्लेअर रोड या भागातील इमारतींना गेल्यावर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यावेळी या इमारतीमधील रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्यासाठी नोटीस जारी केल्या होत्या. या नोटीशींनुसार त्यांच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरासाठीही प्रयत्न करण्यात आले होते. मात्र या वर्षी म्हाडाचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याची आणि म्हाडाला विसर पडल्याची चर्चा सर्वत्र आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -