बेलापूर न्यायालयाची राज ठाकरेंना नोटीस

Raj Thackeray said Building roads, building bridges, mobile in hand is not considered progress

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackery) यांना नवी मुंबईतल्या बेलापूर न्यायालयाची (Belapur court) नोटीस पाठवली आहे. २०१४ मध्ये वाशी टोलनाक्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांच्या नावे बेलापूर न्यायालयाने नोटीस बजावली आहे. बेलापूर न्यायालयाने ६ फेब्रुवारीला राज ठाकरे यांना हजर राहण्यास सांगितले आहे.

यामुळे राज ठाकरे यांना बजावली नोटीस

२०१४ साली नवी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात भडकावू भाषण केले होते. टोलनाक्या संदर्भात हे भाषण केल्यानंतर २६ जानेवारी २०१४ साली मनसे कार्यकर्त्यांकडून वाशी टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वारंवार राज ठाकरे यांना समन्स बजावल्यानंतरही त्यांनी प्रत्यक्षरित्या किंवा वकीलामार्फत कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अखेर बेलापूर न्यायालयाने राज ठाकरे यांना याप्रकरणी नोटीस बजावली आहे. ६ फेब्रुवारी रोजी बेलापूर न्यायालयाने राज ठाकरे यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान २०१४ साली मनसेने केलेल्या टोल वसुलीविरोधातील आंदोलनामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे मनसे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना अनेक नोटीस बजावण्यात आल्या होत्या. तसेच मनसे कार्यकर्त्यांवर देखील अनेक गुन्हा दाखल करण्यात आले होते.


हेही वाचा – फ्रॅक्चर हातासह राज ठाकरेंनी आटोपल्या नियमित बैठका, डॉक्टरांनी दिला होता विश्रांतीच्या सल्ला