घरमुंबई'सम्राट कायमचा बंद झाला' - राज ठाकरे

‘सम्राट कायमचा बंद झाला’ – राज ठाकरे

Subscribe

जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतील महापालिका कर्माचारी, बेस्ट कामगार, हॉटेल वर्कर्स, फेरीवाले यांचे नेता होते. त्यांच्या मागणीसाठी ते मुंबई बंद करायचे. म्हणून त्यांनना 'बंद सम्राट' अशी पदवी दिली जायची.

माजी संरक्षणमंत्री आणि कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले. जॉर्ज फर्नांडिस यांनी कामगार कसा असावा हे जगाला दाखवून दिले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झाले आहे. जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधानांपासून सर्वच राजकीय नेत्यांनी ट्विट करुन दु:ख व्यक्त केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अनोख्या पध्दतीने फर्नांडिस यांना श्रध्दांजली वाहिली आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून ‘सम्राट कायमचा बंद झाला’ असे कॅप्शन देऊन राज ठाकरे यांनी जॉर्ज फर्नांडिस यांना श्रध्दांजली वाहिली.

- Advertisement -

जॉर्ज फर्नांडिस बंद सम्राट

राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रामध्ये जॉर्ज फर्नांडिस हातात पेपर घेऊन भाषण ठोकताना दाखवले आहे. ते ज्या माईकमध्ये बोलत आहे तो माईक रडताना दाखवला असून त्या व्यंगचित्राला ‘सम्राट कायमचा बंद झाला’ असे कॅप्शन दिले आहे. फर्नांडिस आणि बंद हे नातं अतूट होते की, त्यांना बंद सम्राट असे म्हटले जायचे. जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतील महापालिका कर्माचारी, बेस्ट कामगार, हॉटेल वर्कर्स, फेरीवाले यांचे नेता होते. त्यांच्या मागणीसाठी ते मुंबई बंद करायचे. म्हणून त्यांनना ‘बंद सम्राट’ अशी पदवी दिली जायची.

हेही वाचा – 

- Advertisement -

जॉर्ज फर्नांडिस यांच्याबद्दल या गोष्टी जाणून घ्या

चर्चचे फादर बनता बनता जॉर्ज फर्नांडिस कामगार नेते झाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -