घरदेश-विदेशजॉर्ज फर्नांडिस यांच्याबद्दल या गोष्टी जाणून घ्या

जॉर्ज फर्नांडिस यांच्याबद्दल या गोष्टी जाणून घ्या

Subscribe

माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे वयाच्या ८८ वर्षी निधन झाले आहे. आज सकाळी सहा वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांचा जीवन प्रवास हा अनेक तरुणांना प्रेरणा देणाराआहे.

माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे वयाच्या ८८ वर्षी निधन झाले आहे. त्यांचे जीवन हे संघर्षाने भरलेले आहे. अनेकदा तुरुंगात जाऊनही सत्यासाठी ते लढत राहिले. त्यांच्या जीवनकथेवरून अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल. जॉर्ज फर्नान्डिस यांचा जन्म ३ जून १९३० रोजी कर्नाटक राज्यात झाला. जॉर्ज यांच्या आईवर पाचवा किंग जॉर्ज याच्या विचारांचा प्रभाव असल्यामुळे त्यांचे नाव जॉर्ज ठेवण्यात आले होते. जॉर्ज फर्नान्डिस यांना १० भाषांचे ज्ञान होते. हिंदी, इंग्रजी, तमिळ, कन्नड, उर्दु, मल्याळी, तुल्लू, कोंकणी आणि लॅटिन भाषेचे त्यांना ज्ञान होते.

नोकरीच्या शोधात १९४९ साली ते मुंबईत आले होते. मुंबईतील एका वृत्तपत्रामध्ये त्यांना प्रुफ रिडर म्हणून काम केले होते. या ठिकाणी ते कामगार नेते प्लासिड डी मेलो आणि समाजवादी राममनोहर लोहिया यांच्या संपर्कात आले. यांच्या विचारांचा जॉर्ज यांच्या जीवनावर परिणाम झाला. यानंतर ते समाजवादी व्यापार संघाशी जोडल्या गेले.

- Advertisement -

असा आहे त्यांचा जीवन प्रवास

१९३० – कर्नाटकच्या मँगलोर येथे जन्म
१९४६ – धर्मगुरुच्या प्रशिक्षणासाठी ते बँगलोर येथे गेले
१९४८ – बँगलोरच्या सेंट पीटर सेमिनेरी मध्ये त्यांनी शिक्षण घेतले
१९४९ – नोकरीसाठी ते मुंबईत आले आणि सामाजिक व्यापार संघात ते सहभागी झालेत
१९५० ते १९६० त्यांना अनेक आंदोलनाचे नैतृत्व केले
१९७१ – लैला कबीर यांच्याशी विवाह
१९७४ – सर्वात मोठे रेल्वेचे आंदोलन घडवून आणले
१९८० – जॉर्ज आणि लैला हे विभक्त झालेत आणि १९८४ मध्ये जया जेटली या त्यांच्या पत्नी बनल्या
१९९८ – परमाणु परीक्षणाची घोषणा
२००९ – राज्यसभेत झालेल्या निवडणुकीत बिनविरोध नेता म्हणून निवडले गेले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -