Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ठाकरी स्वाक्षरी ! मराठी कण्याला, कलेला, कर्तृत्वाला बंडखोर शैलीने हुंकार

ठाकरी स्वाक्षरी ! मराठी कण्याला, कलेला, कर्तृत्वाला बंडखोर शैलीने हुंकार

Related Story

- Advertisement -

मराठी कण्याला – कलेला – कर्तृत्वाला ज्यांच्या बंडखोर शैलीने हुंकार दिला ती लफ्फेदार ठाकरी स्वाक्षरी ! अशा शब्दात उल्लेख करतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे या तीनही व्यक्तीमत्वांची स्वाक्षरी मनसेकडून मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मराठी स्वाक्षरीसाठीची मोहीम हाती घेतलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेने तिघांच्या फोटोसह ही स्वाक्षरी प्रसिद्ध केली आहे. मराठीचा प्रचार, प्रसार करणे म्हणजेच महाराष्ट्रधर्म असाच काहीसा प्रसार या सोशल मिडियाच्या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने संपुर्ण राज्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या स्वाक्षरीच्या कार्यक्रमासाठी परवानगी नसतानाही मनसेने सरकारलाच थेट आव्हान देत मराठी स्वाक्षरी दिन साजरा करणार असल्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान पेलत आज राज्यात अनेक ठिकाणी स्वाक्षरी मोहीम पार पडली. या स्वाक्षरी मोहीमेसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे हेदेखील आज शिवाजी पार्क येथे आयोजित कार्यक्रमासाठी हजर झाले होते.

बाळासाहेब ठाकरे यांची स्वाक्षरी 

Bal Thackeray

केशव ठाकरे यांची स्वाक्षरी 

- Advertisement -

keshav thackeray

राज ठाकरे यांची स्वाक्षरी 

Raj Thackeray

स्वाक्षरी मराठीत करण्याचे आवाहन

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना मराठीत स्वाक्षरी करण्याचे आवाहन केले आहे. मराठीत लिहिण्याच्या सवयीचा भाग म्हणजे किमान स्वाक्षरी तरी करायलाच हवी. आपण किमान सहीच्या निमित्ताने तरी मराठी लिहायला हवी. मी जेव्हा मराठीत स्वाक्षरी करतो तेव्हा आपल्या भाषेसाठीचा एक आदर वाटतो. किमान स्वाक्षरीच्या माध्यमातून तरी आपण मराठीची सवय ठेवायला हवी असेही ते म्हणाले.


 

- Advertisement -