घरमुंबईमोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला १४ दिवसांची कोठडी

मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला १४ दिवसांची कोठडी

Subscribe

भिवंडी येथील कैलास नगर पहाडीवरच्या दर्ग्यावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लुटणाऱ्या अटल चोऱ्याला पोलिसांनी गजाआड केले असून त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

भिवंडी येथील कैलास नगर पहाडीवरच्या दर्ग्यावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ‘तुम्ही चोर असून मुलींची छेड काढता’, अशी भीती दाखवून त्यांच्याकडील मोबाईल हिसकावण्याची घटना घडली होती. याबाबत नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी बादशाह बशीर शेख (२०) या आरोपीला गजाआड केले असून त्याची १४ दिवसांसाठी रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे.

राजीव गांधी नगर पहाडीवरच्या दर्ग्यावर दर्शनासाठी येणारे भाविक सुभाष बाबूलाल वर्मा (१९) आणि बिपीनकुमार पटेल (२४) या दोघांना आरोपी बादशाह बशीर शेख यांनी भीती दाखवून त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडून १४ हजार ९०० रुपये किंमतीचे दोन मोबाईल हिसकावून पलायन केले होते. याबाबतचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी एएसआय दिलीप दुधाडे यांना गुन्हेगाराला तात्काळ जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एएसआय दुधाडे यांनी खबऱ्यामार्फत माहिती घेऊन आरोपी भंडारी कंपाऊंडमधील रामचंद्र हॉटेल येथे येणार असल्याची माहिती मिळवली आणि रात्रीच्यावेळी सापळा लावला. त्यावेळी आरोपी बादशाह हा घटनास्थळी येताच त्याच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४ मोबाईल आढळून आले आहेत. बादशाह यास रविवारी अटक करून भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा  – मोबाईल चोरीचे पासवर्ड ‘कौआ’ आणि ‘मशीन’


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -