पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी, शस्त्रास्त्रांसह आलेल्या दोघांना अटक

modi mumbai visit pm narendra modi mumbai toure two person in police custody one with deadly weapon and fake soldier bkc ground

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. मुंबईतील बीकेसी मैदानात 19 जानेवारी झालेल्या सभेतून दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून प्राणघातक शस्त्रं जप्त करण्यात आली आहे.

रामेश्वर मिश्रा आणि कटराम कावड अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत. संशयित आरोपींमधील एकाकडून स्मिख अँड वॅगन स्प्रिगफिल्ड रिव्हॉल्व्हरसह चार राऊंड जप्त करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी बीकेसीच्या मैदानात त्यांची जाहीर सभा झाली, या सभेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. या गर्दीतून दोन संशयितांना शस्त्रांसह पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. रामेश्वर मिश्रा हा संशयित आरोपीने लष्कराच्या गार्ड्स रेजिमेंटमधील नाईक असल्याचा बनाव करत सभास्थळीवर VIP च्या जागी प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्न करत होता.

यावेळी मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना मिश्राच्या हालचाली संशयास्पद वाटल्या, त्यामुळे पोलीस बराच वेळ त्याच्याकडे नजर ठेवून होते. त्याने गळ्यात एलिट नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) चे ओळखपत्र घातले होते, आणि त्यावर ‘रेंजर’ म्हणून तैनात असल्याचे लिहिले होते. पण ओळखपत्राच्या रिबिनवर ‘दिल्ली पोलिस सुरक्षा (PM) असे लिहिल्याचे समोर आले आहे.

यावेळी पोलिसांनी त्याला हटकावले, त्यावेळी आरोपीने आपण ‘एनएसजी’च्या पठाणकोट हबमध्ये असल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याचा गळ्यातील आयडी बनावट असल्याचं समोर आलं. त्याच्याविरोधात आयपीसी कलम 171, 465, 468 आणि 471 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अटकेतील संशयिताला वांद्रे कोर्टाने 24 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अटक केलेला दुसऱ्या संशयिताचे नाव कटराम चंद्रगार्ड कावड असून तो भिवंडीतील रहिवासी आहे. हा एका हॉटेल आणि ट्रान्सपोर्टसाठी काम करतो. पण तो बीकेसीमध्ये मोदींच्या सभेसाठी आला होता. कटरामविरोधात आता बीकेसी पोलिस ठाण्यात कलम 37(1), 135 मापोका 1951 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही संशयित आरोपी कोणाच्या सांगण्यावरून सभास्थळी आले होते? सोबत शस्त्र घेऊन येण्यामागचा उद्देश काय होता? हे पोलीस तपासातून स्पष्ट होईल, त्यामुळे या तपासाकडे सर्वांच लक्ष लागल आहे.


Android फोनसाठी Google नं बंद केलं ‘हे’ फीचर, नेमकं कारण काय?