भाजपमध्येच मुंडेंना बदनाम करणारा एक गट, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

Chandrashekhar Bawankule

मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये काहीतरी बिनसल्याचं बोललं जात आहे. फडणवीसांमुळेच पंकजा मुंडेंना राज्याच्या राजकारणातून आऊट करत राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, भाजपमध्येच मुंडेंना बदनाम करणारा एक गट असल्याचं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, भाजपमध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तिचं लोकं बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतर बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिलं आणि ती माझी जबाबदारी आहे. मी काही उपकार वैगेरे केले नाहीत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

पंकजा मुंडे आमच्या नेत्या असल्यामुळे त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे त्यांना नंतर बोला. मी आधी बोलतो हा त्यामागील आशय होतो, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडे नाराज असल्याच्या प्रश्नावर याआधीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती. पंकजा मुंडे माझ्याशी रोज बोलतात. माझी आणि त्यांची परवाच चर्चा झाली. परवा त्यांची प्रकृती ठीक नव्हती. कधीकधी व्यक्तिगत अडचणी येत असतात. एखाद्या कार्यक्रमाला एखादा नेता उपस्थित राहू शकत नाही. प्रत्येक नेत्याची व्यस्तता वेगळी असते, असं बावनकुळे म्हणाले होते.

माझ्या मनात कोणतीही खदखद नाही – पंकजा मुंडे

पंकजा मुंडेंचा भाजपकडून अपमान होत असल्याने ठाकरे गटाने त्यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली होती, त्यावरील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, माझ्या मनात कोणतीही खदखद नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनीच यावर उत्तर दिलं आहे. तीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.

माझ्या मनात कोणतीही खदखद नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले, त्या कार्यक्रमांमध्ये मी उपस्थित राहणं अपेक्षित नव्हतं, म्हणून मी तिथे आले नाही. आज माझे प्रदेशाध्यक्ष आले होते. त्यामुळे मी आले. जे.पी.नड्डा जेव्हा आले तेव्हाही मी आले. मी भाजपाची सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षाच्या बाहेरच्या कार्यक्रमांना जाणं मला बंधनकारक वाटत नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.


हेही वाचा :नाराजीच्या चर्चांवर पंकजा मुंडेंचं स्पष्ट