घरमुंबईमुड इंडिगो यंदा ‘झिरो वेस्ट फेस्टिव्हल’

मुड इंडिगो यंदा ‘झिरो वेस्ट फेस्टिव्हल’

Subscribe

आयआयटीत अवतरली बॅटरी ऑपरेटेड कार

आयआयटी मुंबईच्या मुड इंडिगो फेस्टिव्हलमध्ये यंदा शून्य कचरा मोहिमेचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण फेस्टिव्हलमध्ये तयार होणार्‍या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी आयआयटी मुंबईत पुढाकार घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या फेस्टिव्हलमधून कोणताही कचरा निर्माण न होता, त्यावर विघटनासाठीचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. यंदाच्या मुड इंडिगोमध्ये पहिल्यांदाच झिरो वेस्ट फेस्टिव्हलची थीम राबविण्यात आली आहे.

थिंक बिफोर थ्रॅश इट अशा घोषवाक्यांचे फलक ठिकठिकाणी आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये विविध ठिकाणी झळकले आहेत. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण कचरा गोळा करण्यापासून त्याची प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आयआयटी मुंबईच्या ५५० एकरच्या कॅम्पसमध्ये हा संपूर्ण फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. फेस्टिव्हलसाठी दरवर्षी १.४३ लाख इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची हजेरी असते. यंदाच्या मुड इंडिगोमध्येही म्युझिशिअन आणि स्टॅण्ड अप कॉमेडियनचे परफॉर्मन्स आहेत. बॉलिवुड गायक के के आणि कॉमेडियन झाकीर खान यांची हजेरी फेस्टिव्हलला आहे.

- Advertisement -

बॅटरी कार आयआयटीच्या मोठ्या कॅम्पसमध्ये आतापर्यंत डिझेलच्या बसेस धावत होत्या. कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांसाठी ही बसेसची सेवा इतके वर्षे सुरू होती. पण यंदाच्या मुड इंडिगोमध्ये पहिल्यांदाच बॅटरी ऑपरेटेड कारचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आयआयटी मुंबईच्या मोठ्या कॅम्पसमध्ये प्रसिद्ध असणारी बसेसची सेवा अखेर थांबली आहे. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे हादेखील झिरो वेस्ट फेस्टिव्हलचा भाग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -