घरCORONA UPDATEMumbai Corona Update : मुंबईत सोमवारी २८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर २७...

Mumbai Corona Update : मुंबईत सोमवारी २८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर २७ जणांची कोरोनावर मात

Subscribe

मुंबईत जवळपास २ आठवडे मृत्यूदर हा शून्यावर आहे. मुंबईतील बाधितांची संख्या कमी झाली त्याचप्रमाणे मृत्यूदरही शून्यावर आल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली असून मुंईत गेली अनेक दिवस दोन अंकी कोरोना रुग्ण संख्या नोंदवण्यात येत आहे. मुंबईत मागील २४ तासात केवळ २८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल ही संख्या २७ इतकी होती. म्हणजेच दररोजच्या बाधितांची संख्या कमी जास्त होत आहे. तर मुंबईत आज एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. मुंबईत जवळपास २ आठवडे मृत्यूदर हा शून्यावर आहे. मुंबईतील बाधितांची संख्या कमी झाली त्याचप्रमाणे मृत्यूदरही शून्यावर आल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आत मुंबईत १२ ते १४ वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकर कोरोनापासून सुरक्षित असल्याचे आपण म्हणू शकतो.

- Advertisement -

त्याचप्रमाणे मुंबईतील आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा विचार केला असता मुंबईत आज २७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही १ लाख ३७ हजार ७१३ इतकी आहे. मुंबईत आज एकूण ९ हजार २८३ कोरोना चाचण्या करण्यात आल्यात त्यातील केवळ २८ चाचण्या पॉझिटिव्ह आल्यात. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकाही रुग्णाला हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी जाण्याची गरज भासलेली नाही.

मुंबईतील एक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होऊन २९९ वर आली आहे. मुंबईचा सध्याचा रिकव्हरी रेट हा ९८ टक्के इतका आहे. तर १४ मार्च ते २० मार्च पर्यंतचा मुंबईचा विचार केला असता मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट हा ०.००३ टक्के इतका आहे.

- Advertisement -

मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी घट होत असून आज राज्यात एकूण ९९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १८० रुग्ण कोरोनामुक्त झालेत. मुंबई प्रमाणे राज्यातही आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.


हेही वाचा – Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा आलेख घसरला; 99 नवे रुग्ण, 180 जण कोरोनामुक्त

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -