Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली, गेल्या २४ तासात ६०८ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर

Mumbai Corona Update: 608 corona cases recorded in last 24 hours in mumbai
Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली, गेल्या २४ तासात ६०८ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्येत घट झाली आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारची चिंता वाढली होती. परंतु कोरोनाबाधितांची संख्या आता कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येपक्षा कमी नोंदवण्यात येत आहे. मुंबई पालिका क्षेत्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आलं आहे. मुंबईत मागील २४ तासात ६०८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ७१४ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या ८ हजार ४५३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. सोमावारी १८ कोरोनाबाधित नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत एकुण ७ लाख २० हजार ९६४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामधील आतापर्यंत एकूण ६ लाख ९४ हजार ७९६ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई पालिका क्षेत्रात आतापर्यंत १५ हजार ४१४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून मागील २४ तासात २८ हजार २९५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत एकूण ७० लाख ७२ हजार ९५३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील पालिका क्षेत्रात एकूण १८ मृत्यू झालेल्यांपैकी १२ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ९ रुग्ण पुरुष व ९ रुग्ण महिला होते. १ रुग्णाचे वय ४० वर्षा खाली होते. ७ रुग्णांचे वय ६० वर्षा वर होते. उर्वरित १० रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते. मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर आला आहे तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर ७२८ दिवस आहे.