घरCORONA UPDATEMumbai Corona Update : मुंबईत आज २ अंकी कोरोना रुग्णांची नोंद तर...

Mumbai Corona Update : मुंबईत आज २ अंकी कोरोना रुग्णांची नोंद तर सलग तिसऱ्या दिवशी शून्य मृत्यू नोंद

Subscribe

मुंबईत २४ आणि २५ फेब्रुवारी या दोन दिवशी शून्य रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी शून्य मृत्यू नोंद करण्यात आली आहे. मागच्या दोन दिवसात मुंबईत एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.

Mumbai Corona Update : मुंबई सध्या कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, मुंबई आज पहिल्यांदा दोन अंकी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आज पहिल्यांदा इतक्या कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत आज शनिवारी केवळ ८९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कालच्या तुलनेत आज मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईत २४ आणि २५ फेब्रुवारी या दोन दिवशी शून्य रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी शून्य मृत्यू नोंद करण्यात आली आहे. मागच्या दोन दिवसात मुंबईत एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. मंबई आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ही १६ हजार ६९१ इतकी आहे. मागच्या तीन दिवसांपासून या संख्येत कोणताही बदल झालेला नाही.

- Advertisement -

मुंबईत फेब्रुवारी महिन्यात आता सातव्यांदा शून्य मृत्युची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी याच फेब्रुवारी महिन्यात १५,१६ ,१७ , २० , २३ आणि २५ फेब्रुवारी रोजी कोविड बाधित रुग्णांची शून्य मृत्यूची नोंद झालेली होती. मात्र मुंबईत कोविडची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर २ जानेवारीनंतर १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत शून्य मृत्युची नोंद झाली होती. मुंबई महापालिका क्षेत्रात ‘कोविड’चा पहिला रुग्ण हा ‘मार्च २०२०’ मध्ये आढळून आला होता. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा ‘शून्य’ मृत्यूची नोंद महानगरपालिका क्षेत्रात झाली होती.

- Advertisement -

मुंबईत आज एकूण २० हजार ७३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील केवळ ८९ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांपैकी केवळ २० रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील ६ रुग्ण हे ऑक्सिजन बेडवर आहेत. मुंबईतील सध्या अँक्टिव्ह रुग्णांचा विचार केला असता अँक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २०० वर आली आहे.

मुंबईचा १९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी पर्यंतचा विचार केला असता मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट हा ०.०२ टक्के इतका आहे. तर रिकव्हरी रेट हा ९८ टक्के इतका आहे. मुंबईतील सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या आणि सील बंद इमारतींची संख्या शून्यावर आहे.


हेही वाचा – India Corona Update: देशातील रुग्णसंख्येत मोठी घट; २४ तासांत ११,४९९ नव्या रुग्णांची वाढ, २५५ जणांचा मृत्यू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -