Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आज 700 ने घटली; तर 12 जणांचा मृत्यू

मुंबईत आत्तापर्यंत 1,028,715 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

Maharashtra Corona Update 41 New Covid 19 positive cases zero death
India Corona Update : देशभरात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत 13 टक्क्यांनी घट ; मृत्यू दरात वाढ

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या आज पुन्हा मोठ्याप्रमाणात घटली आहे. मागील तीन दिवसांपासून 6 हजारांच्या जवळपास पोहचलेली रुग्णसंख्या आज पुन्हा 5 हजारांवर येऊन पोहचली आहे. त्यामुळे मुंबईसाठी ही कुठेतरी दिलासाजनक बाब आहे. यात कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही आज सर्वाधिक आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 5008 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय आज 12 हजार 913 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत आज नोंदवण्यात आलेल्या नव्या रुग्णांपैकी 420 रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यातील 88 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. दरम्यान आज नोंदवलेल्या 4,207 रुग्णांमध्ये कोणताही लक्षणेही नाहीत. तर 37 हजार 801 बेड्सपैकी केवळ 4,571 बेड्स आता भरलेले आहेत. मुंबईचा कोरोना रिकव्हरी रेट हा 97 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत आत्तापर्यंत 1,028,715 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 9 लाख 95 हजार 338 इतकी झाली आहे. याशिवाय 16 हजार 512 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जानेवारी ते 19 जानेवारी 2022 पर्यंत मुंबईतील एक कोरोना वाढीचा दर हा 0.72 टक्के झाला आहे. मुंबईत आजही शून्य कंटेनमेंट झोन आहेत. तर 29 सक्रीय सीलबंद इमारती आहेत. मुंबईत आज एकूण 50 हजार 032 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तर एकूण चाचण्यांची संख्या ही 148,81,330 इतकी झाली आहे.