घरCORONA UPDATEMumbai Corona Update : मुंबईत आज 6 हजार 032 नवे कोरोनाबाधित रुग्ण,...

Mumbai Corona Update : मुंबईत आज 6 हजार 032 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 12 मृत्यूंची नोंद

Subscribe

मुंबईत आज एकूण 60 हजार 291 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तर एकूण चाचण्यांची संख्या ही 147,78,095 इतकी झाली आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. सलग दोन ते तीन दिवसांपासून रुग्णसंख्या 5 ते 6 हजारांच्या आसपास नोंदवली जातेय. तर मृतांची संख्याही 10 ते 15 च्यादरम्यान नोंदवण्यात आलीय. गेल्या 24 तासात मुंबईत 6 हजार 032 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेय. तर 12 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 18 हजार 241रुग्ण कोरोनामुक्त झाले असून घरी परतले आहेत. काल हीच संख्या 12 इतकी 810 होती. त्यामुळे आज बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आत्तापर्यंत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 9 लाख 66 हजार 985 इतकी झाली आहे. त्यामुळेबरे झालेल्या रुग्णांचा दर 95 टक्क्यांवर पोहचलेय.

मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता 1,017,999 झाली आहे. तर रुग्ण दुपट्टीचा दर 66 दिवसांवर गेला आहे. 12 जानेवारी ते 17 जानेवारी 2022 पर्यंत मुंबईती एक कोरोना वाढीचा दर हा 1.03 टक्के झाला आहे.

- Advertisement -

तर आतापर्यंत झालेल्या मृत्यूची संख्या ही 16 हजार 488 इतकी आहे. मुंबईत आज नोंदवण्यात आलेल्या रुग्णांपैकी केवळ 575 रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यातील 103 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. त्यामुळे ऑक्सिजन बेडवरील आणि रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे प्रमाण आज मात्र वाढले आहे. मुंबईत सध्या शून्य कंटेनमेंट झोन आहेत. तर 54 सक्रीय सीलबंद इमारती आहेत. मुंबईत आज एकूण 60 हजार 291 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तर एकूण चाचण्यांची संख्या ही 147,78,095 इतकी झाली आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -