Mumbai Corona Update: मुंबईची मृत्यूसंख्या घटली,मात्र आज ७ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत सध्या ८९ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर ९७० सक्रिय सील बंद इमारती आहेत.

Mumbai Corona Update: More than 3,000 patients registered in Mumbai, more than 6 lakh corona free
Mumbai Corona Update: मुंबईत ३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, आत्तापर्यंत ६ लाखांहून अधिक कोरोनामुक्त

मुंबईत सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत ३ हजारांनी घट झाली होती. मुंबईत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही घटली होती. मंगळवारीही मुंबईत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या कमी झाली आहे. मुंबईत मंगळवारी २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूदर जरी कमी होत असला तरी मुंबईत रोज नवे रुग्ण समोर येत आहेत. आज मुंबईत ७ हजार ८९७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर आज मुंबईत ११ हजार २६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. मुंबईत आज एकूण ४९ हजार ३२० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईत आतापर्यंत ५ लाख ३५ हजार १७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतार्यंत मुंबईत ४ लाख ३४ हजार ९४१ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत आतापर्यंत १२ हजार ८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मुंबईत आतापर्यंत ४६ लाख ९९ हजार ५०७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत सध्या ८९ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर ९७० सक्रिय सील बंद इमारती आहेत.

मुंबईसह राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहे. राज्यासह मुंबईत कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत काय घोषणा करणार याकडे मुंबईसह राज्याचे लक्ष लागून आहे.


हेही वाचा – लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय होणार?; मुख्यमंत्री रात्री संवाद साधणार