संतापजनक! पंजाबच्या फुटबॉलपटूने तरुणीवर केला बलात्कार

मुंबईतील एका तरुणीवर पंजाबच्या फुटबॉलपटून तरुणीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

rape case
प्रातिनिधिक छायाचित्र

दिवसेंदिवस मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दररोज एक घटना ऐकायला येत असून नुकतीच एक घटना समोर आली आहे. मुंबईतील एका तरुणीवर पंजाबच्या फुटबॉलपटून तरुणीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या दोघांचीही सोशल मीडियावरुन ओळख झाली होती. याप्रकरणी तरुणीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अशी झाली ओळख

मुंबईत राहणाऱ्या एका तरुणीची पंजाबमधील फुटबॉलपटूशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. दरम्यान, हा फुटबॉलपटू गुडघ्याला दुखापत झाली म्हणून त्याच्यावर उपचार घेण्यासाठी मुंबईत आलो असल्याचे बोला. त्यानंतर तो त्या तरुणीला भेटण्यासाठी ती काम करत असलेल्या हेल्थ क्लबमध्ये गेला होता. तसेच दोघांच्याही कुटुंबीयांनी एकमेकांची भेट घेऊन त्यांचे लग्न ठरवले. त्याचदरम्यान या तरुणाने तिला गोरेगावमधील एका हॉटेलवर नेले. तेथे तिला बांधले आणि तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप तरुणीने तक्रारीत केला आहे. तसेच काही दिवसांनी तो पुन्हा ती राहत असलेल्या जे जे मार्ग येथील तिच्या घरी गेला. तेथेही त्यांने दुसऱ्यांदा तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; आरोपीने त्या तरुणीशी लग्न करण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे तिला धक्का बसला आणि तिने त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच तिने तक्रारीत म्हटले आहे की, या तरुणाने तिचे आक्षेपार्ह फोटो काढून तिची बदनामी करण्याची धमकी दिली आहे. मात्र, हा आरोपी नेमका कोण आहे? फुटबॉलपटू आहे का? या माहितीची खातरजमा केली जात आहे. त्यानंतर त्याला मुंबईत आणले जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.


हेही वाचा – कोरोना व्हायरसचं पुन्हा होणारं संक्रमण आणि इम्यूनिटीसंदर्भात दिलासादायक बातमी