घरक्राइमMumbai Crime News : फ्लॅटच्या आमिषाने कलादिग्दर्शकाला 30 लाखांचा गंडा

Mumbai Crime News : फ्लॅटच्या आमिषाने कलादिग्दर्शकाला 30 लाखांचा गंडा

Subscribe

Mumbai Crime News : फ्लॅटचे आमिष दाखवत एका टोळीने कला दिग्दर्शकाची सुमारे तीस लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी मुख्य आरोपीसह अकरा जणांविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : फ्लॅटचे आमिष दाखवत एका टोळीने कला दिग्दर्शकाची सुमारे तीस लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी मुख्य आरोपीसह अकरा जणांविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांना देण्यात आलेल्या फ्लॅटची आरोपी सुरेश गायकवाडसह त्याच्या इतर सहकार्‍यांनी परस्पर विक्री करत अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. त्यामुळे तक्रारदारांनी काळाचौकी पोलिसांत तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सुरेश गायकवाडसह इतर अकराजणांविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा सौदा करत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai crime news : fraud in sale and purchase of flats by creating bogus documents)

पोलीस कुटुंबीय राहात असलेल्या इमारतीच्या दहाहून अधिक फ्लॅटची विक्री करुन या टोळीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी सुरेश रामभाऊ गायकवाड, कुसुम रामभाऊ गायकवाड, देवीदयाल सोहनलाल गुप्ता, नलिनी सूर्यकांत बोराडे, राजेश सूर्यकांत बोराडे, योगेश सूर्यकांत बोराडे, भुपेंद्र सूर्यकांत बोराडे, निर्मला चंद्रप्रकाश बोराडे बोराडे, देवेंद्र चंद्रप्रकाश बोराडे, अरुणा संतोष कांदेकर आणि करुणा विजयसिंह पर्बत या अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी माहीम येथे राहणाऱ्या कला दिग्दर्शकांनी तक्रार केली आहे. गेल्या वर्षी तक्रारदारांची आरोपी देवीदयालशी ओळख झाली. या ओळखीत त्याने त्यांचा परिचित सुरेश गायकवाड याची कॉटनग्रीन परिसरात स्वतःची लक्ष्मी नावाची एक इमारत असून या इमारतीमधील काही फ्लॅटची विक्री करायची आहे, असे सांगितले. हे फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून देवीदयालने कला दिग्दर्शकाची ओळख सुरेशशी करून दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Salman Khan : सलमानच्या वांद्रे गॅलेक्सी आणि पनवेल फॉर्महाऊसची महिन्यांपूर्वी रेकी; तपासात माहिती उघड

सुरेशने त्यांना लक्ष्मी इमारतीमध्ये दोन फ्लॅट दाखविले होते. त्यापैकी एक फ्लॅट आवडल्याने त्यांनी तो फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला. या फ्लॅटचा व्यवहार तीस लाखांमध्ये ठरला. ठरल्याप्रमाणे त्यांनी जुलै 2023 रोजी सुरेशला तीस लाखांचे पेमेंट केले. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला. या कराराच्या वेळेस त्यांना इतर आरोपींनी फ्लॅटचे बोगस रिलीज डीड आणि पॉवर ऑफ ऍटर्नीचे कागदपत्र दाखविले. त्याद्वारे त्यांच्यात भाडेपट्ट्याचा हस्तांतरणपत्र करारनामा झाला. त्यात सुरेश गायकवाड आणि अमरजीत पाटील यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली. मात्र तीन महिने उलटूनही सुरेशने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे ते तिथे चौकशीसाठी गेले होते. यावेळी त्यांना त्यांच्या रूमसह सुरेशच्या कार्यालयाला कुलूप दिसले. चौकशीदरम्यान त्यांना इमारतीची जागा बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या मालकीची असून सध्या त्या जागेचा ताबा महाराष्ट्र शासन म्हणजे मुंबई पोलिसांकडे असल्याचे कळले. लक्ष्मी इमारतीमधील फ्लॅट पोलीस कुटुंबियांना राहण्यासाठी देण्यात आला होता. तिथे सर्वच पोलीस कुटुंबीय राहत होते. (Mumbai crime news : fraud in sale and purchase of flats by creating bogus documents)

- Advertisement -

सुरेश आणि त्याच्या इतर सहकार्‍यांनी अशाच प्रकारे लक्ष्मी इमारतीच्या दहा फ्लॅटची परस्पर विक्री करुन अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला. या इमारतीचा पुनर्विकास होणार असून तिथे 22 मजली इमारत बांधण्यात येणार आहे. तिथे त्यांना 415 चौ. फुटाची जागा मिळेल असे सांगितले होते. त्याच्या आमिषाला बळी पडून संबंधित दहाजणांनी कुठलीही शहानिशा न करता सुरेश गायकवाडकडून दहा फ्लॅटचा व्यवहार केला होता. मात्र त्यापैकी कोणालाही फ्लॅटचा ताबा न देता सुरेशसह इतर सर्व आरोपी पळून गेले होते. लक्ष्मी इमारतीच्या पुर्नविकासासाठी सुरेशने मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाला एक प्रस्ताव दिला होता. त्याचा प्रस्ताव संबंधित कार्यालयातून अमान्य करण्यात आला होता. अशा प्रकारे मुंबई पोलिसांना देण्यात आलेल्या फ्लॅटची सुरेश गायकवाड आणि त्याच्या इतर सहकार्‍यांनी परस्पर विक्री करुन अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला. त्यामुळे तक्रारदारांनी काळाचौकी पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सुरेश गायकवाडसह इतर अकराजणांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Mumbai crime news : fraud in sale and purchase of flats by creating bogus documents)

हेही वाचा – Crime News : वाढदिवस शेवटचाच ठरला; मैत्रिणीच्या हत्येप्रकरणी आरोपी मित्राला अटक


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -