घरताज्या घडामोडीसहकार संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतंत्र विभाग करु, दरेकरांचे मुंबै बँक कार्यकर्ता मेळाव्यात...

सहकार संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतंत्र विभाग करु, दरेकरांचे मुंबै बँक कार्यकर्ता मेळाव्यात आवाहन

Subscribe

मुंबईतील सहकारी संस्थेवर अडचण निर्माण झाली तर, त्या सहकार संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी मुंबई जिल्हा बॅंकेच्या (मुंबै बँक) माध्यमातून स्वतंत्र विभाग कार्यान्वित करु. असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेते व मुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केले. मुंबईतील सहकारी चळवळ संस्कारित करण्याचे काम आगामी काळामध्ये करायचे आहे. त्यादृष्टीने सुरक्षित सहकार निर्माण करण्याची आपली भूमिका आहे. त्यामुळे येणा-या काळात मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून सुरक्षित आणि संस्कारित सहकारासाठी काम करुया असे प्रवीण दरेकर म्हणाले.

मुंबईतील दादर येथे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणुकीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे उद्धाटन विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी दरेकरांनी कार्यकर्त्यांनी संवाद साधला. या मेळाव्याला ७०० हून अधिक कारयकर्ते उपस्थित होते. दरेकर म्हणाले की, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना आणल्या. गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास, माथाडी, गिरणी कामगार, पोलिसांना घरे तसेच कोकण रेल्वे, कॉटन फेडरेशनला अर्थसहाय्य, महिला बचत गटांना सबलीकरणासारख्या योजना गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत आणल्या गेल्या व त्यांचा लाभ राज्यातील समाजातील विविध घटकांना ख-या अर्थाने झाला असल्याचे दरेकर म्हणाले.

- Advertisement -

बॅंकेने १० हजार कोटीचा पल्ला पार पडला

दरम्यान प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा १२०० कोटीची बॅंक होती पण आज बॅंकेने १० हजार कोटीचा पल्ला पार पडला आहे. बॅंकेला अ वर्ग मिळवून दिला. राज्यातील उत्तम बॅंक म्हणून बॅंक ख-या अर्थाने नावारुपास आली आहे. बॅंकेचे ग्राहक, ठेवीदार आदींनी बॅंकेवर जो विश्वास दाखविला त्या विश्वासातूनच आज बॅंक हे प्रगतीचे शिखर गाठू शकली असेही दरेकर यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज माघार घेतल्याबद्दल आभार – दरेकर

मुंबई बॅंकेच्या निवडणुकीतून विविध विभागातून विलास पाटील, संबोधी कांबळे, राहुल पाटील, कृष्णा कांबळे आदी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याबद्दल प्रवीण दरेकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

- Advertisement -

पेट्रोल पंपावर काम करणारा श्रीमंत होतो तर मजूर का नाही

पेट्रोल पंपावर काम करणारा कामगार धीरुभाई अंबानी जर श्रीमंत होऊ शकतो तर श्रमिकांच्या महाराष्ट्रातील कष्टकरी मजूर का श्रीमंत होऊ नये असा सवाल करतानाच केवळ आकसाने व सूडबुध्दीने लिहीणा-यांच्या विरोधात दरेकर यांनी खेद व्यक्त केला. फक्त टार्गेट करुन सहकार चळवळीला व नेत्यांना बदनाम करु नये असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले.

काही चुकीचे घडत असल्यास त्या-त्या ऑथोरिटी आहेत. न्यायालय व पोलिस आहेत, त्यांच्याकडे दाद मागता येईल व ते योग्य ती कारवाई करु शकतील, पण आपण ऑथोरिटी असल्यासारखे वागू नये असा उपरोधिक टोलाही दरेकर यांनी लगावला.

जर तीन पक्ष एकत्र येऊन सरकार बनवतात तर..

जर तीन पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार बनवू शकतात तर सहकाराच्या प्रांगणात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून जात पात याच्या पलीकडे सहकारात एकत्रित काम करण्याचा वसंतदादा पाटील यांनी दिलेला खरा मूलमंत्र जपण्याचे काम मुंबईतील सहकारातील कार्यकर्ते करीत असल्याबद्दल दरेकर यांनी अभिनंदन व्यक्त केले.

सहकार संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतंत्र विभाग

आगामी काळामध्ये मुंबईच्या कुठल्याही सहकारी संस्थेवर अडचण निर्माण झाली तर त्या सहकार संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी मुंबई जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून स्वतंत्र विभाग कार्यान्वित करु, तसेच मुंबई जिल्हा बॅंक त्यासाठी पालकाच्या भूमिकेत निश्चितपणे काम करेल असे आश्वासनही दरेकर यांनी दिले. आज दुदैर्वाने सहकारी संस्था, सहकारी साखर कारखाने खाजगी तत्वावर दयावे लागत आहेत. आज ग्राहक सहकरी संस्था बंद आहेत याचा आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. या संस्था फक्त मतदानासाठी आहेत का. जर या संस्था व्यवस्थित चालत नसतील तर जिल्हा बॅंक म्हणून विचार करुन अशा सहकारी संस्थांना उर्जितावस्थेत आणले पाहिजे असे मतही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.


हेही वाचा : देशासमोरील अनेक समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत, शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -