Mumbai Local : वाशीजवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड; हार्बर लाईनवरील लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Local signal system failure at vashi station panvel up and down local service jammed
Mumbai Local : वाशीजवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड; हार्बर लाईनवरील लोकल सेवा विस्कळीत

नवी मुंबईतल्या वाशी स्थानकाजवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. याचा फटका कामावर जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. विशेषत: नवी मुंबईतील नागरिकांना याचा फटका सहन करावा लागला. अनेक प्रवाशांना लोकल सेवा विस्कळीत होण्यामागचे कारण स्पष्ट न झाल्याने कामावर जायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान पनवेल मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका सहन करावा लागतोय.

पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान मानखूर्द ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखूर्द आणि पनवेल ते वाशी अशी लोकलसेवा मर्यादित स्वरूपात सुरू ठेवण्यात येत असल्याच्या सूचना नवी मुंबईतल्या स्थानकांवर रेल्वे प्रशासनाकडून दिल्या जात आहेत.

दरम्यान सेंट्रल रेल्वे प्रशासनाने मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करत म्हटले की, सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त झाल्यानंतर लोकल सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

फक्त हार्बरच नाही तर ठाणे – वाशी या ट्रान्सहार्बर मार्गावरची लोकल सेवाही सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांना वाशी, पनवेल किंवा पनवेलहून सीएसएमटीदरम्यान प्रवास करायचा आगे त्यांचे खूप हाल होत आहेत.

दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते नेरूळ आणि ठाणे ते पनवेल ही लोकलसेवा सुरळीत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. परंतु इतर मार्गावरील लोकल सेवेचे वेळापत्रक बिघडल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागतेय.


Live Update : भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यभरातील मनसैनिक आक्रमक, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपडक सुरु