Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मुंबईत सोमवारपासून नोंदणीशिवाय लसीकरण, लोकलबाबत किशोरी पेडणेकर यांचे स्पष्ट वक्तव्य

मुंबईत सोमवारपासून नोंदणीशिवाय लसीकरण, लोकलबाबत किशोरी पेडणेकर यांचे स्पष्ट वक्तव्य

आपण गाफिल न राहता माझे कुटूंब माझी जबाबदारी असं वागले तर तालुका जिल्हा कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही

Related Story

- Advertisement -

राज्याला ८ लाख ७० पेक्षा अधिक डोस मिळण्याची शक्यता आहे देशभरात मोफत लसीकरण सुरु झाले आहे. तरुणांच्या लसीकरणाला ब्रेक लागला हे नक्की आहे. यामुळे खासगी सेंटरमध्ये श्रीमंतांनी हजारो रुपये मोजून लस घेतली आहे. मुंबईकर आणि राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण पार पाडण्याच्या टप्प्यात आलो आहे. राज्य सरकार आणि पालिका प्रशासन लीसकरण करत आहे. सोमवार मंगळवार आणि बुधवार वॉक इन लसीकरण म्हणजेच नोंदणीशिवाय लसीकरण होणार तर गुरुवार शुक्रवार शनिवारी नोंदणी करुन आणि वॉक इन लसीकरण सुरु असल्याचे मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

घरोघरी लसीकरण नाही ५ ते १० मीटरच्या जसे आरोग्य शिबीरे घेतो तसे लसीकरण कॅम्प सोसायटी सोसायटीमध्ये झाली पाहिजे. तसच जर लसी केंद्र सरकारकडून मिळाले तर राज्य सरकार लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु करेल असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

आजच्या घडीला प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये एक लसीकरण सेंटर हवं आहे. आता एका नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये १ ते २ लसीकरण केंद्र तयार करण्यात आल्या आहेत. ज्या नगरसेवकांच्या कक्षामध्ये ज्या आमदार आणि खासदार यांनी मिळून जी केंद्र तयार केली आहेत. या केंद्रांमध्ये द्यायला हरकत नाही. ज्यांना सोसायटीमध्ये लसीकरण करायचे आहे आणि ते काळजी घेणार असतील तर तांना संपर्क करुन किती लोकांना जाणार आणि माहिती घेऊन केले तर जास्त लसीकरण होईल. उद्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु होणार आहे. रिक्षावाले, फेरीवाले यांना प्राधान्याने लस देण्यात येणार असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

तिसरी लाट सगळ्यांसाठी भयानक

तज्ञांचे मत आहे की, तिसरी लाट सगळ्यांसाठी भयानक ठरणार आहे. आपण लस घेतले, दोन डोस घेतले असतील तरी काळजी घ्यावी लागणार आहे. डेल्टा व्हेरियंटस आता डेल्टा प्लस होणार आहे. यामुळे आपण गाफिल न राहता माझे कुटूंब माझी जबाबदारी असं वागले तर तालुका जिल्हा कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने काळजी घेतली तरी आपण जसे दुसऱ्या लाटेला थोपवले आहे तसेच तिसरी लाटही थोपवू असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

प्रत्येक वॉर्डला २ अशी भरारी पथक नेमण्यात आली आहेत. संबंधित वॉर्डमध्ये लसीकरण होत असेल तर त्या लसीकरण केंद्रावर जाऊन त्यांची चौकशी करणं, लसीची एक कुपी जप्त करण आणि हे लसीकरण कोण करत आहे. या संबंधित माहिती ही महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डला असली पाहिजे. सीरम इन्स्टिट्यूटला कुपी दिली असून या कुपीत व्हॅक्सीन होतं का याबाबत माहिती घेण्यासाठी पाठवले आहे. कांदीवलीचा प्रकार झाल्यानंतर लोक सतर्क झाली आहेत. लसीकरण केंद्रावर देण्यात येणाऱ्या लसीकरणाला परवानगी आहे का नाही याची पडताळणी करुन लोकं लस घेतली असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

लोकल अजूनही प्रलंबित

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या अजूनही कमी झाली नाही आहे. सध्या ५०० ते ६०० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे मुंबईतील लोकल सुरु करण शक्य नाही. थोडं अजून रुग्णसंख्या कमी झाल्यावर लोकलबाबत निर्णय घेणार आहोत. अशी माहिती मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -