Breaking : कुर्ल्यात जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला!

मुंबईतील कुर्ला येथील इमारतीचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलीस पोहोचले असून बचावाचे काम सुरू आहे.

कुर्ला येथील एल वॉर्ड मधील, सीएसटी रोडवरील नीता बिल्डींगचा काही भाग आज कोसळला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान पोहोचले असून इमारतीतील लोकांना सुरक्षित बाहेर काढले जात आहे.  दुपारी १२ वाजता ही घटना घडली.