घरमुंबई'त्या' ९ गर्भवती महिलांना सुखरुप बाहेर काढले

‘त्या’ ९ गर्भवती महिलांना सुखरुप बाहेर काढले

Subscribe

विशेष म्हणजे महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अनेक महिलादेखील प्रवास करत होत्या. त्यापैकी ९ महिला या गर्भवती असल्याचे समजते. त्यांनाही सुखरुप रेस्क्यू करुन एका सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले आहे.

मुंबईला शुक्रवारी मुसळधार पावसाचा फटका बसला. तर, सर्वात जास्त परिणाम झाला तो म्हणजे मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला. रुळावर अचानक भरलेल्या पाण्यामुळे ही एक्सप्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी इथेच थांबली. या एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ७०० प्रवासी अडकले होते. आता या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यानुसार, बचावकार्य पूर्ण झालं असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

एक्सप्रेसमध्ये ९ गरोदर महिला 

विशेष म्हणजे महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अनेक महिलादेखील प्रवास करत होत्या. त्यापैकी ९ महिला या गर्भवती असल्याचे समजते. त्यांनाही सुखरुप रेस्क्यू करुन एका सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसंच, एका महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्याची माहितीही समोर आली आहे.

- Advertisement -

३७ डॉक्टरांची टीमही वांगणीत

पावसाचे पाणी रुळावर साचल्याने ही एक्स्प्रेस मध्येच थांबवण्यात आली. त्यानंतर, सकाळी त्वरित बचावकार्य सुरू करण्यात आलं. या बचावकार्यात एनडीआरएफसह नौदलाचे आणि हवाईदलाचे चॉपर्सही सामिल झाले. दरम्यान, या जवानांना प्रत्येक प्रवाशाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान, महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बदलापूर स्थानकापर्यंत नेण्यात येणार असून त्यांच्यासाठी जेवणाचीही सोय करण्यात आली आहे. तसंच, ३७ डॉक्टरांची टीमही वांगणीत दाखल झाली आहे. ज्यामुळे, अडकलेल्या प्रवाशांपैकी कोणालाही दुखापत झाली असल्यास त्यांच्यावर तात्काळ उपचार करता येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -