Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Mumbai corona update: गेल्या २४ तासात ५७० कोरोनाबाधित तर १० जणांचा मृत्यू

Mumbai corona update: गेल्या २४ तासात ५७० कोरोनाबाधित तर १० जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मुंबईसह राज्यभरात कहर केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता डेल्टा प्लसच्या व्हेरिएंट्समुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत सोमवारी ५२१ जणांना कोरोना संसर्ग झाला तर ७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मात्र आज मंगळवारी मुंबईत गेल्या २४ तासात ५७० जणांना कोरोनाची बाधा झाली तर १० जणांचा आज कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारच्या तुलने आज मंगळवारी कोरोना बाधितांसह कोरोना बळींचा आकडा देखील वाढल्याचे दिसून आले.

- Advertisement -

मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख २२ हजार ४६१ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून यामध्ये मागील २४ तासात ५७० कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ६ लाख ९० हजार ४१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये आज ७४२ कोरोना रुग्णांनी मात केली आहे. मुंबई पालिका क्षेत्रात १४ हजार ४५३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत आतापर्यंत १५ हजार ३१५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून यामध्ये मगाील २४ तासात १० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत मागील २४ तासात ३२ हजार ३०७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत ६८ लाख ७३ हजार ६२१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याचा दर ९५ टक्क्यावर गेला आहे. तर कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर ७२६ दिवसांवर गेला आहे. मुंबईत ११ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर सक्रीय ८६ सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासात मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ६ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ५ रुग्ण पुरुष व ५ रुग्ण महिला होते. १ रूग्णांचे वय ४० वर्षांखाली तर ८ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित १ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.


धक्कादायक! राजावाडी रुग्णालयात बेशुद्ध रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडला; चौकशीचे आदेश
- Advertisement -