घरमुंबईMumbai : शिवसेना-भाजपच्या वादात ‘उर्दू सेंटर’ रखडले; रईस शेख यांचा आरोप

Mumbai : शिवसेना-भाजपच्या वादात ‘उर्दू सेंटर’ रखडले; रईस शेख यांचा आरोप

Subscribe

मुंबई : राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील शिवसेना-भाजपच्या वादात आग्रीपाडा-भायखळा येथील मुंबई महापालिकेच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या उर्दू लर्निंग सेंटरचे (उर्दू घर) काम रखडले आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आज (25 मार्च) केला. पाच मजली बांधण्यात येत असलेल्या सेंटरचे 43 टक्के बांधकाम झाले असून पावसाळ्यात या इमारतीची वाताहात होण्याची भीती व्यक्त करत शेख यांनी याप्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. (Mumbai Shiv Sena-BJP dispute stalls Urdu Centre Allegation of Raees Shaikh)

हेही वाचा – IPL 2024 : प्लेऑफ सामने मुंबईत नाही तर या दोन शहरांत; फायनल कुठे पाहा?

- Advertisement -

उर्दू सेंटरचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल आहे. मात्र बांधकामावर कुठल्या प्रकारची स्थगिती आहे का? हे स्पष्ट नाही. भाजपाचे मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा आणि शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव या सत्ताधारी आमदारांच्या वादात स्थानिक जनता उर्दू लर्निंग सेंटर पासून वंचित राहत आहे. त्यामुळे जनतेच्या पैशांतून 12 कोटी खर्च करून उभारण्यात येत असलेल्या सेंटरचा लाभ जनतेला मिळाला पाहिजे, असे शेख म्हणाले.

हेही वाचा – Nashik Constituency : नाशिकच्या जागेसाठी भाजपा आग्रही; फडणवीसांच्या भेटीनंतर देवयानी फरांदेंचे वक्तव्य

- Advertisement -

सन 2011 मध्ये मुंबई महापालिकेने राज्य आयटीआयला 171 चौरस मीटरचा भूखंड 30 वर्षे करारावर भाड्याने दिला होता. आयटीआय सेंटर न केल्याने पालिकेने तो परत घेतला. 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालिकेने त्या भूखंडावर उर्दू लर्निंग सेंटर बांधण्याचे काम हाती घेतले. मात्र आमदार कोटेचा यांनी विरोध केल्याने आणि भाजपने उर्दू लर्निंग सेंटरचा प्रकल्प मुस्लिम धर्मियांशी जोडल्याने प्रकल्प रखडल्याचा आरोप रईस शेख यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -