घरCORONA UPDATEखुशखबर! मुंबईकरांना आता पाण्याचे नो टेन्शन

खुशखबर! मुंबईकरांना आता पाण्याचे नो टेन्शन

Subscribe

कोरोनाची खबरदारी म्हणून साबणाने मिनिटा मिनिटाला हात धुताना पाण्याची टाकी कमी झाल्याची बोंब मुंबईकरांकडून ऐकायला मिळणार नाही.

‘कोरोना’मुळे अनेक खासगी कंपन्या, शाळा, कार्पोरेट कंपन्यांसह उद्योग धंदे आणि कारखाने बंद असल्यामुळे सध्या सर्वांकडून वापरल्या जाणाऱ्या पाण्यात बचत होत आहे. परिणामी हे सर्व पाणी सध्या नागरिकांच्या भांड्यांमध्ये येऊन पडत आहे. मुंबईला होत असलेल्या पाणी पुरवठ्यातील एकही थेंब कमी करण्यात आलेले नाही. त्यामुळे कंपन्या, उद्योगधंदे, कारखान्यांना मिळणाऱ्या पाण्याचा वापर निवासी वस्तीतील लोकांना करता येत आहे. त्यामुळेच कोरोनाची खबरदारी म्हणून साबणाने मिनिटा मिनिटाला हात धुताना पाण्याची टाकी कमी झाल्याची बोंब मुंबईकरांकडून ऐकायला मिळत नाही.

दरदिवशी ३ हजार ८०० दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा

मुंबईला दरदिवशी ३ हजार ८०० दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, एप्रिल महिन्यापासून मुंबईकरांची पाण्याची मागणी वाढते. एप्रिलपासून जास्त पाण्याची मागणी असल्यामुळे कमी दाबाने किंवा कमी प्रमाणात मिळत असलेल्या पाण्यामुळे बोंबाबोंब सुरु होते. परंतु, यंदा १५ मार्चपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह साऱ्या देशात लॉकडाऊन केल्यामुळे अनेक खासगी कार्यालये, कंपन्या, शाळा, कॉलेज, उद्योग धंदे, कारखाने, शॉपिंग मॉल्स, दुकाने, शॉपिंग सेंटर्स तसेच हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे याठिकाणी होणारा निवासी वापर, तसेच वाणिज्यिक आणि औद्योगिक वापराच्या पाण्याची बचत होत आहे. त्यामुळे याठिकाणी जाणारे पाणी आता निवासी इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वापरता येत आहे. साहजिकच याचा निवासी वापराचे पाणी अधिक तथा मुबलक मिळू लागल्यामुळे अनेक भागांमध्ये पाण्याच्या नावाने तक्रारी दिसून येत नाही.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी जास्तीत जास्त हात धुण्यात यावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने केले जात आहे. त्यामुळे भाजपचे नगरसेवक हरिष भांदीर्गे यांनी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांना निवेदन देऊन कोरोनाचे संकट असेपर्यंत मुंबईकरांना अधिक पाण्याचा पुरवठा केला जावा, अशी सूचना केली होती. परंतु, त्यांच्या मागणीचा अप्रत्यक्ष फरक आता दिसून येत असून औद्योगिक आणि वाणिज्यिक तसेच काही निवासी भागातील पाणी आता थेट निवासी इमारतींकडे वळले जात असल्याने त्यांना आता मुबलक पाणी मिळत आहे. महापालिकेचे जलअभियंता अजय राठोर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सध्या मुंबईला नियमित पुरवठा केला जाणारा ३ हाजर ८०० दशलक्ष लिटर्स एवढा कायम आहे. काही वाणिज्यिक आणि औद्योगिक वापराच्या पाण्याची बचत होत असल्यामुळे याचा वापर निवासी वापराच्या पाण्यात होऊन याचा लाभ नागरिकांना होत असल्याचे स्पष्ट केले.

मुंबईकरांची वर्षभराची तहान : १४ लाख ४४ हजार दशलक्ष लिटर्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -