घरताज्या घडामोडीमुंब्रा कौसाच्या प्राईम रूग्णालयाला मध्यरात्री शॉर्ट सर्किटने आग, ४ रुग्ण दगावले

मुंब्रा कौसाच्या प्राईम रूग्णालयाला मध्यरात्री शॉर्ट सर्किटने आग, ४ रुग्ण दगावले

Subscribe

प्राईम रुग्णालयात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते.

मुंबईसह राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना एकीकडे मात्र रुग्णालयात लागणाऱ्या आगीचे सत्र सुरुच आहे. बुधवारी मध्यरात्री ३:४० वाजता मुंब्राच्या कौस येथील प्राईम क्रिटीकेअर रुग्णालयाला भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. प्राईम रुग्णालयात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. त्यातील ४ जणांचा दुसऱ्या रुग्णालयात नेताना व आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना १ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आगीची माहिती मिळताच मुंब्र्याचे आमदार व राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड तसेच ठाणे महापालिकेचे अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाचे जवान आग नियंत्रणात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. मुंब्रा कौसाचे प्राईम रुग्णालय  नॉन कोविड असून ज्यांना कोविडची सदृश लक्षणे दिसताच पण कोविड झालेला नाही अशा रुग्णांना या रुग्णालयात दाखल केले जाते.  मृतांमध्ये शमीम (५८) आणि यास्मिन सिद्दिकी (५२) हलीमा सलिमानी, श्री सोनावणे या चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. आगीचे वृत्त कळताच मुंब्र्याचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयाला भेट दिली व मदत कार्य जलद गतीने होऊ शकले. या आगीच्या चौकशासाठी समिती नेमली जाईल असेही आव्हाड यांनी सांगितले.


मुंब्रा कौसा येथे प्राईम क्रिटी केअर रुग्णालय आहे तेथे संशयित रुग्णांवर रुग्णांवर रुग्णांवर उपचार केले जातात. आज पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. रुग्णालयात सतरा रुग्ण दाखल होते त्यातील चार जणांचा या भूषण दुर्घटनेत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रुग्णालयाला आग लागल्याची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी रुग्णालयाकडे धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -