घरताज्या घडामोडीमुंबईच्या प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयोगाचा शिक्कामोर्तब, पालिका निवडणुका लवकरच होणार

मुंबईच्या प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयोगाचा शिक्कामोर्तब, पालिका निवडणुका लवकरच होणार

Subscribe

मुंबई महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबईच्या प्रभाग रचनेबाबत हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणुकांच्या कामाला वेग आलेला दिसत आहे. परंतु प्रभाग रचनेवरुन निवडणुका खोळंबणार असल्याचे चित्र होते. अखेर पालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोग आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी मुंबई महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. आयुक्तांनी मुंबई महानगरपालिका अधिनियमांच्या कलम ५ च्या तरतूदीखाली मुंबई महागनरपालिकेच्या सभासदांची संख्या २३६ ठेवण्यात आली आहे. मुंबई क्षेत्र जितक्या प्रभागात विभागता येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे. २३६ पर्यंत प्रभाग रचना जाहीर केली असल्यामुळे आता निवडणुकांच्या कामांना वेग येईल. कोणता प्रभाग कुठपर्यंत आहे? याची सर्व माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी रात्री उशीरा जारी केली आहे. मुंबई शहरात एकूण ३२ प्रभागांमध्ये सुधारणा केल्याचा दावा पालिकेच्या निवडणूक शाखेकडून करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला २ आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. जुन्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिले होते. परंतु राज्य निवडणूक आयोगाने निर्णयाला आव्हान दिले आहे.

महानगरपालिकेने नव्या प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करुन १० मार्च रोजी हरकती सूचनांची कार्यवाही पूर्ण केली होती. या प्रभागरचनेबाबतचा अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात आला होता. यावर आयुक्तांनी सादरीकरणसुद्धा केले आहे. या प्रभाग रचनेला आयुक्तांकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला असून अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आता त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार आहे. यावेळी ५८ प्रभागातून १७३ नगरसेवक निवडून येणार आहेत. तर एक प्रभाग हा २ नगरसेवकांचा राहणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Delhi Fire : दिल्लीतील अग्नितांडवात २७ लोकांचा होरपळून मृत्यू, आग नियंत्रणात

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -