घरमुंबईउद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी शिंदे गटातील 'या' नेत्याचे नाव...

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी शिंदे गटातील ‘या’ नेत्याचे नाव चर्चेत

Subscribe

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी शिंदे गटातील नेत्याच्या नावाची चर्चा सुरू आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासोबत विधानपरिषेदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. विधानपरिषेदवरील जागेसाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून हकालपट्टी केलेले माजी मंत्री रामदास कदम यांचे नाव चर्चेत आहे.

रामदास कदमांचे नाव चर्चेत –

- Advertisement -

विधानपरिषेदेत एक जागा रिक्त आहे. ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या जागेवर शिंदे गट दावा सांगणार की ती जागा भाजपला जाणार , असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडे ही जागा गेल्यास या जागेसाठी चढाओढ होण्याची शक्यात आहे. या चढओढीत माजी मंत्री रामदास कदम यांचे नाव चर्चेत आहे.

उद्धव ठाकरेंनी दिला होता राजीनामा –

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्रिपद आणि विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा दिला होता. फेसबुक लाईव्हद्वारे रात्री साडेनऊ वाजता त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला होता.

रामदास कदम शिंदे गटात –

शिवसेना नेते रामदास कदम पर्यावरण मंत्री होते. ते चार वेळा विधानसभेवर, तर दोन वेळा परिषदेवर आमदार होते. गेल्या वेळी तिकीट नाकारल्यानंतर ते नाराज होते. त्यांनी अखेर एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -