घरमुंबईमोदी.. तुमच्या पापाचा घडा भरला आहे - नवाब मलिक

मोदी.. तुमच्या पापाचा घडा भरला आहे – नवाब मलिक

Subscribe

तुरुंगात टाकण्याचा खेळ तुम्ही सुरू केला आहे त्यामुळे तुमच्या पापाचा घडा भरला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदींनी केलेल्या टिकेला सडेतोड उत्तर दिले आहे. गोंदियाच्या सभेत नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. याचा अर्थ मोदींना देशात भाजपचा पराभव होणार आहे हे दिसू लागले आहे, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे. दरम्यान, विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी मोदी देत आहेत. त्यांच्या या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरून जाणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.


हेही वाच – काँग्रेसचा जाहीरनामा पाकिस्तानची भलामन करणारा – मोदी

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात आज दुसरी सभा झाली. गोंदिया येथे झालेल्या दुसऱ्या सभे दरम्यान, मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. ‘राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा की, आजकाल त्यांना झोप का येत नाही? राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप दिल्लीच्या तिहार तुरुंगात पोहोचली आहे. काही बोललो तर आपण तुरुंगात जाऊ, ही भीती त्यांना वाटत आहे. आता ते दिवस लांब नाहीत, जेव्हा सर्व सत्य बाहेर येईल.’ अशी टीका मोदींनी राष्ट्रवनादी काँग्रेसच्या नेत्यांवर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -