घरमुंबईस्फोटकांच्या स्कॉर्पिओचे प्रकरण एनआयएकडे

स्फोटकांच्या स्कॉर्पिओचे प्रकरण एनआयएकडे

Subscribe

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ पार्क केलेल्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. तसेच मुकेश अंबानी यांना पत्राद्वारे धमकीही देण्यात आली होती. कारमधील स्फोटक प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करणार आहे. तर कारचा मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथक करणार आहे.

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर रस्त्यालगत कार पार्क करण्यात आली होती. या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि एक धमकीचे पत्र सापडले होते. या पत्राद्वारे मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना धमकावण्यात आले होते. या घटनेनंतर खळबळ उडाली होती. सुरुवातीला केलेल्या तपासात ही कार मनसुख हिरेन यांची असल्याचे उघड झाले होते. विक्रोळीतून ती चोरीला गेल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. या प्रकरणात त्यांचीही चौकशी करण्यात आली होती. दुसरीकडे या घटनेची जबाबदारी एका संघटनेने घेतली होती. दरम्यान, या घटनेवरून राज्याच्या राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली होती. फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात यावा, अशी मागणी केली होती.

- Advertisement -

या घटनेचा तपास सुरू असतानाच, मनसुख हिरेन अचानक बेपत्ता झाले होते. दुसर्‍या दिवशी त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला होता. रविवारी अखेर महाराष्ट्र एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अनोळखी व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. हिरेन यांच्या पत्नी विमला यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात यापूर्वी हिरेन हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला होता. मुंब्रा पोलीस ठाण्यात एडीआर दाखल करण्यात आला होता.

महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या निर्देशानुसार हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे. या मृत्यू प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे ही एटीएसकडे देण्यात आली आहेत. आता एटीएस या प्रकरणाचा तपास करणार आहे. दुसरीकडे, अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास आता एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा तपास एनआयएकडे सोपवला आहे.

- Advertisement -

यापूर्वीच हा तपास आपल्या गृहमंत्र्यांनी एटीएसकडे दिला आहे. या सगळ्या यंत्रणा कोणा एकट्याची मक्तेदारी नसतात. सरकार येते तेव्हा यंत्रणा तीच असते. स्वत:वर आत्मविश्वास असावा लागतो तो आमच्याकडे आहे, प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणेवर विश्वास असावा लागतो तोदेखील आमच्याकडे आहे आणि म्हणून एटीएसकडे हा तपास दिला आहे. पण एनआयएकडे हा तपास देण्याचा डाव केंद्राचा असेल तर याच्यात काहीतरी काळंबेरं आहे आणि हे आम्ही तपासातून उघड केल्याशिवाय राहणार नाही.
-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -