घरताज्या घडामोडीमुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वेंना मुदतवाढ नाही!

मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वेंना मुदतवाढ नाही!

Subscribe

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा आणि निवडणुका झाल्यानंतर लगेच दुसऱ्यांदा अशी दोनदा मुंबई पोलीस आयुक्तपदी मुदतवाढ मिळालेले आयपीएस अधिकारी संजय बर्वे यांना आता तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात विधानभवनात पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे. ‘संजय बर्वे यांना पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसून मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण असणार, हे तुम्हाला लवकरच कळेल’, असं अनिल देशमुख म्हणाले. १९८७च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले संजय बर्वे यांनी याआधी राज्याच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून देखील कामकाज पाहिले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडून बर्वेंनी पदभार स्वीकारला होता. मागील वर्षी नोव्हेंबर २०१९मध्ये संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यााधी विधानसभा निवडणुकांच्या आधी देखील त्यांना अशाच प्रकारे तीन महिन्यांची मुदतवाढ सेवेत देण्यात आली होती.

मनसेच्या दाव्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून घुसखोर दाखवा आणि ५ हजार ५०० रुपये मिळवा अशा प्रकारचं आवाहन लोकांना केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे योग्य नसल्याचं यावेळी बोलताना सांगितलं. ‘मनसेकडून अशा प्रकारचं आवाहन दिलं जाणं योग्य नसून त्यासंदर्भात राज्य सरकारकडून योग्य ती पावलं उचलली जातील’, असं अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.


वाचा सविस्तर – मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -