घरमुंबईमुंबईकरांसाठी नवं वर्षाचं मोठं गिफ्ट, ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ

मुंबईकरांसाठी नवं वर्षाचं मोठं गिफ्ट, ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ

Subscribe

५०० चौरस फूट घरे असलेल्यांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे १ हजार कोटींचा तोटा महापालिकेला होणार आहे.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. ५०० चौरस फूट घरे असलेल्यांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची घोषणा केली. शनिवारी नगरविकास विषयक ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख व्हीसीद्वारे बैठकीला उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील माहिती विधानसभेत दिली होती. दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे १ हजार कोटींचा तोटा महापालिकेला होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात मुंबईकरांचा ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करत असल्याचं सांगितलं. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत आहोत. या निर्णयाचा १६ लाख कुटुंबांना लाभ होईल. मुंबईकरांसाठी महत्वाकांक्षी आणि क्रांतीकारी निर्णय असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या मनात मुंबईकरांसाठी तळमळ आहे. रुग्णालयात असूनही जनतेचे काम करत आहेत. शिवसेना दिलेल्या वचनाला जागते, दिलेला शब्द पाळते. कोविड काळात विकास कामांना कात्री लावली नाही, असं सांगत सर्वसामान्यांच्या हिताचा हा निर्णय असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या जाहिरनाम्यामध्ये महापालिकेवर आमची सत्ता आली की, आम्ही ५०० चौरस फुटांच्या घरावरील मालमत्ता कर सरसकट माफ करु. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये याबद्दल प्रश्न विचारला असता. एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबद्दल महापालिकेचा प्रस्ताव आला आहे आणि त्याबद्दल काम देखील सुरू आहे, असी माहिती दिली होती.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सुचना

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना मोठी भेट दिली असून ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसेच या निणर्याची तत्काळ अंमलबजावणी करा अशा सुचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. या निर्णयामुळे साधारणत: १६ लाख कुटुंबांना लाभ होईल.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -