घरमुंबईमुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादणार नाही; समिती अध्यक्षांची मुंबईकरांनी ग्वाही

मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादणार नाही; समिती अध्यक्षांची मुंबईकरांनी ग्वाही

Subscribe

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असताना मुंबईकरांवर मालमत्ता करवाढ, पाणीपट्टी करवाढ अशी कोणतीही करवाढ लादण्यात येणार नाही, अशी ग्वाही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मुंबईकरांना दिली आहे. पालिका प्रशासनाने, मुंबईकरांवर मालमत्ता करवाढ लादण्याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला होता. मात्र त्यास विरोध झाल्यानंतर तो प्रस्ताव मंजूर न करता राखून ठेवण्यात आला. आता तो प्रस्ताव पालिका विधी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

त्यामध्ये, काही प्रमाणात मालमत्ता करवाढ करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र याबाबत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, आम्ही मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव मंजूर न करता फेटाळून लावला असून आता विधी समितीच्या बैठकीतही सदर प्रस्ताव फेटाळून लावण्यात येईल. कारण की, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असताना आणि मुंबईकर त्यामुळे अगोदरच त्रस्त झालेले असताना मुंबईकरांवर मालमत्ता करवाढ असो की पाणीपट्टी करवाढ आम्ही कोणत्याही पद्धतीची करवाढ मुंबईकरांवर लादणार नाही, अशी ग्वाही यशवंत जाधव यांनी दिली आहे.

- Advertisement -

भाजपची स्टंटबाजी

मालमत्ता करवाढीचा कोणताही निर्णय घेतलेला नसताना भाजपवाले उगाच मालमत्ता करवाढीच्या नावाने बोंबा मारून, आमचा विरोध आहे, असे सांगून स्टंटबाजी करीत आहेत. वास्तविक, जेव्हा याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली तेव्हा भाजपने असा विरोध केला नाही. आणि आता मालमत्ता करवाढीला विरोध असल्याचे सांगून वरातीमागून घोडे नाचवत आहेत. जणू यांनाच मुंबईकरांची काळजी वाटते, आम्ही सत्ताधारी असून आम्ही मुंबईकरांची योग्य ती काळजी घेत आहोत. त्यामुळेच मुंबईत शिवसेनेला वारंवार सत्ता मिळते आहे. भाजपने आम्हाला उगाच काही शिकविण्याच्या भानगडीत पडू नये, असा टोला यशवंत जाधव यांनी भाजपला लगावला आहे.


भारतीयांना लवकरच चौथी कोरोना लस होणार उपलब्ध! zydus cadila च्या मान्यतेसाठी अर्ज करणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -