घरमुंबईमिठी परिसरातील झोपट्यांना लवकरच नोटीसा

मिठी परिसरातील झोपट्यांना लवकरच नोटीसा

Subscribe

अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई

मुंबईतील मिठी नदी परिसरात असणार्‍या अनधिकृत बांधकामंवर लवकरच कारवाई होणार आहे. या परिसरात असलेल्या झोपड्यांचे सर्वेक्षण तातडीने पुर्ण करुन त्यांना नोटीसा द्या. त्याचबरोबर अनधिकृत झोपडपट्यांवर कारवाई करण्याच्या सूचना मंगळवारी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज मंत्रालयात प्लास्टिक बंदी आणि मिठी नदीवरील अतिक्रमण निष्कासित करण्यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, प्रधान सचिव अनिल डिग्गीकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी वरील सूचना केल्या आहेत.

- Advertisement -

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रामदास कदम म्हणालेकी, मुंबई आणि मुंबई परिसरात प्लास्टिक बंदी मोहीम यशस्वी होत असून क्रॉफर्ड मार्केट आणि दादरच्या फुल मार्केटमध्ये काही दुकानदार फुले आणि भाजी देण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा सरार्स वापर करताना दिसतात. महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांनी अशा विक्रेत्यांवर कारवाई सुरु करुन दंड आकारावा. या परिसरात पहाटे चार- पाच वाजता प्लास्टिक घेवून गाड्या येतात.

अशा गाड्यांवर कारवाई करुन पोलिसांत तक्रार दाखल करावी. असे प्लास्टिक कोणत्या शहरातून येते, त्या कंपनीचे नाव याची देखील नोंद घ्यावी.या बैठकीला पर्यावरण विभागाचे तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -