घरमुंबईयेऊरमध्ये आता खेळांवर बंदी

येऊरमध्ये आता खेळांवर बंदी

Subscribe

वनविभागाची टर्फ क्लबला नोटीस

ठाण्यातील निसर्गरम्य येऊर परिसरात मॉनिंग वॉकसाठी जाणार्‍या नागरिकांना पासेसशिवाय नो एन्ट्रीचा आदेश संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्याकडून काढला असतानाच, आता त्या परिसरातील मैदानांवर होणार्‍या खेळांवर बंदी घालण्यात आली आहे. ठाण्याच्या वनविभागाने टर्फ क्लबला नोटीस बजावून तशी ताकीद दिली आहे. येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून वनविभागाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

येऊर येथील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात रात्री बेरात्री प्रखर प्रकाशझोतात तसेच लाऊडस्पीकर लावून चालणार्‍या खेळांना तसेच लग्नसमारंभाना बंदी घालण्यात यावी, यासाठी येऊर येथील स्थानिक नागरिक आणि येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या माध्यमातून पोलीस प्रशासन तसेच वन अधिकार्‍यांकडे अनेक महिन्यांपासून पाठपुरावा केला होता. प्रखर प्रकाशझोतामुळे व गोंगाटामुळे वन्यजीवांच्या हालचालींवर निर्बंध येतात तसेच ते वाट चुकतात.

- Advertisement -

बुधवार 4 डिसेंबरला बिबट्याचा बछडा रस्त्याच्या कडेला आढळून आला होता. त्यावरून वन्यजीवन हे रात्रीच्या खेळांमुळे व पार्ट्यांमुळे कसे विस्कळीत झाले आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. अखेर खडबडून जागे झालेल्या वनविभागाने तातडीने पावले उचलत टर्फ क्लबना नोटीसा बजावल्या आहेत. येऊर परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी रसिक सावला, अविनाश सिंग आणि गुरूकुल क्रिकेट अ‍ॅकडेमी यांना या नोटीसा बजावल्या आहेत.

संपूर्ण येऊर गाव हे पर्यावरण संवेदनशिल क्षेत्रात राखीव केलेले आहे. आपल्या मार्फत चालणार्‍या खेळांमुळे वन्यजीवांच्या आधिवासात बाधा उत्पन्न होत असून त्यामुळे वन्यजीवांच्या जीवीतावर विपरीत परिणाम होत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेले येऊर गाव हे पूर्ण शांतता झोनमध्ये येत असून या ठिकाणी रात्री 10 वाजल्यानंतर कोणताही जमाव जमा करून घ्वनी करणे निषिध्द आहे. त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून खेळ तात्काळ बंद करावेत अन्यथा आपणाविरोधात पर्यावरण अधिनियम अन्वये कठेार कारवाई करण्यात येईल, असेही नोटीशीत नमदू करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -