घरक्राइमठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या राड्याचे निमित्त

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या राड्याचे निमित्त

Subscribe

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आले होते. या प्रकरणी पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. यात पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. यानुसार थोड्याच वेळात ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनीच्या पूर्वसंध्येला शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केल्यानंतर ठाकरे गटाचे अनिल देसाई, अनिल परब यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर दाखल झाले होते. यावेळी शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी होत असल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Balasaheb Thackeray : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठाकरे-शिंदे गट आमने-सामने; जोरदार घोषणाबाजी

ठाकरे गटाला पाठवलेल्या नोटीसवर संजय राऊत म्हणाले…

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या नोटीसवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, “शिवतीर्थावर झालेल्या राड्याची सुरुवात कोणी केली, त्यांच्यावरती नोटीस कारवाई का केली नाही? शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर गद्दार आणि बेईमान लोकांनी पाय ठेवू नये आणि स्वत:ला शिवसैनिक समजात मग आमच्या लोकांनी तुडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर कशाला गुन्हे दाखल करत आहेत. नोटिसांना कोण विचारतो. पाठवा तुम्हा काय नोटिसा पाठवायच्या आहेत. 2024पर्यंत तुम्हाला जेवढा कागावा करायचा आहे तो करा.”

- Advertisement -

हेही वाचा – IND vs AUS Final: भारतीय संघाच्या पराभवानंतर मोहम्मद शमीच्या आईची तब्येत बिघडली

महिलांना धक्काबुक्की झाली; शिंदे गटाचा आरोप

ठाकरे आणि शिंदे गटाच्या राडा झाल्यानंतर त्या दिवशी शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के माध्यमांशी बोलताना म्हणाले, “ठाकरे गटाने हिंदुत्वाचे विचार सोडून दिले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ते अशा पद्धतीचे वागणूक करत आहेत. त्यांनी महिलांना धक्काबुक्की केली आहे. हे निषेधार्ह आहे, असे नरेश म्हस्के म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -