घरमुंबईरेल्वे स्थानकांवर आता अत्याधुनिक प्रतिक्षालये

रेल्वे स्थानकांवर आता अत्याधुनिक प्रतिक्षालये

Subscribe

प्रवाशांना सर्व सुविधा मिळणार

मुंबईच्या रेल्वे प्रवाशांसाठी आयआरसीटीसीकडून एक आनंदाची बातमी आहे. लवकर मुंबईच्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक विश्रामगृह उभारण्याची योजना आयआरसीटीसीने आखली आहे. त्यामुळे लवकरच रेल्वे प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर काही तासांसाठी विश्रांती करण्याकरिता अत्याधुनिक विश्रांती गृहे मिळणार आहेत. नवी दिल्ली, जयपूर, विजयवाडा, आग्रा, विशाखापट्टम आणि अहमदाबादमधील रेल्वे स्थानकांवर इंडियन आयआरसीटीसीने हे विश्रांती गृहे उभारले आहे. त्याला रेल्वे प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

अनेकदा रेल्वे प्रवाशांना लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रवास करून आलेल्या प्रवाशांना आंघोळीसाठी आणि दोन-तीन तासांच्या प्रतिक्षेसाठी खासगी हॉटेलची मदत घेत असतात. त्यात त्यांचे पैसे सुद्धा खूप खर्च होत असतात. त्यामुळे त्यांची ही गरज लक्षात घेता. आयआरसीटीसीने अत्याधुनिक विश्रांती गृहे सुरु करण्याची योजना आखली होती. त्याला प्रतिसाद बघता आता मुंबईतील रेल्वे स्थानकांवर अशा प्रकारचे अत्याधुनिक विश्रांती गृहे सुरू करण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पासाठी सर्व प्रथम मुंबई सेंट्रलवर सुरु करण्याच्या मानस आयआरसीटीसीचा आहे. पश्चिम रेल्वेकडून जागा मिळताच, अत्याधुनिक विश्रांती गृहे उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यानी दिली आहे.

- Advertisement -

असे असणार विश्रांती गृहे

३ हजार चौरस फुटांच्या जागेवर या विश्रामगृहांची उभारणी केली जाणार आहे. यात एकूण ५० ते ६० प्रवाशी हे एकाच वेळी विश्रांती घेऊ शकणार आहेत. ही विश्रांतीगृहे पूर्णत: वातानुकूलित असणार आहेत. प्रवाशांना किमान २ तासांची विश्रांती करता येणार आहे. त्यासाठी साधारणत: १५० रुपये शुल्क आकारण्यात येणार असून जर अतिरिक्त तास आराम करायचा असेल तर प्रति तास ५० रुपये घेण्यात येणार आहे. सोबत पाहिजे तेव्हा नास्ता, चहा किंवा जेवन करायचे असेल तर ती सुविधासुद्धा या विश्रांतीगृहात मिळणार आहे.

या मिळणार सुविधा

१ ) नि:शुल्क इंटरनेट सेवा
२) वर्तमानपत्र, मासिक
३ ) वामकुक्षीसाठी आरामदायी खुर्च्या
४ ) वर्तमानपत्र, मासिक,
५ ) दूरचित्रवाहिनी संच (टीव्ही)
६) ट्रेन इन्फॉर्मेशन डिसप्ले
५) अत्याधुनिक स्वच्छतागृह

- Advertisement -

खाद्यपदार्थाचे दर
नास्ता – १५० रुपये
शाकाहारी जेवन – २५०
मांसाहारी जेवण – २७५
सॅन्क्स कॉम्बो – १५० रुपये

सध्या आम्ही हा अत्याधुनिक विश्रांतीगृहाचे प्रकल्प सहा ठिकाणी सुरू करणार आहोत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच आम्ही मुंबईच्या काही प्रमुख रेल्वे स्थानकांवर हा प्रकल्प सुरु करण्याची योजना आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे.
– पिनाकिन मोरावाला, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -