घरमुंबईगोरेगाव नेस्को कोविड सेंटरवर कोविड योद्ध्यांचं आंदोलन; सुविधा मिळत नसल्याचा आरोप

गोरेगाव नेस्को कोविड सेंटरवर कोविड योद्ध्यांचं आंदोलन; सुविधा मिळत नसल्याचा आरोप

Subscribe

मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा नर्स आणि डॉक्टरांचा इशारा

मुंबईतील गोरेगाव नेस्को कोविड सेंटरवर नर्स आणि डॉक्टरांनी संप पुकारला आहे. या संपामध्ये नेस्को कोविड सेंटरच्या १५० नर्सेसचा सहभाग असून डॉक्टरांचा देखील या आंदोलनात सहभाग आहे. दरम्यान, नेस्को कोविड सेंटरमधील नर्स आणि डॉक्टरांनी राहण्यासह खाण्या-पिण्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून हा संप रविवारी पुकारला आहे. यासंदर्भातील कोविड योद्ध्यांनी गोरेगाव नेस्को कोविड सेंटर वरिष्ठांकडे तक्रार देखील केली होती, मात्र तक्रार दाखल करुनही कोणतीही दखल घेतली न गेल्याने यंत्रणेवर नर्स आणि डॉक्टरांचा आरोप आहे. तर आमच्या प्राथमिक मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा नेस्को कोविड सेंटरवर नर्स आणि डॉक्टरांनी दिला आहे.

कोविड योद्ध्यांच्या आंदोलनाला यश?

दरम्यान, गोरेगाव नेस्को कोविड सेंटरच्या नर्स आणि डॉक्टरांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी कोविड योद्ध्यांनी रविवारी संप पुकारला होता. यासंदर्भातील मागण्या पूर्ण करण्याची मागणी कोविड योद्ध्यांनी नेस्को कोविड सेंटरच्या वरिष्ठांकडे केली होती. कोविड सेंटरचे नर्स, डॉक्टर्स आणि नेस्को कोविड सेंटरच्या वरिष्ठांनध्ये चर्चा झाली. यावेळी या कोविड योद्ध्यांच्या प्राथमिक गरजा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात नेस्कोकडून देण्यात आले आहे. त्यामुळे कोविड योद्ध्यांनी त्यांच्या प्राथमिक गरजांसाठी पुकारलेल्या या आंदोलनाला यश आले आहे, असे म्हणता येईल.

- Advertisement -

यासोबतच आज मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सायन,नायर,केईएम आणि कुपर रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. कोरोनाच्या परिस्थिती डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहे. मात्र त्याच्या वेतनात वाढ केलेली नाही. त्याचबरोबर डॉक्टरांच्या विद्यावेतनावर टिडीएस कापला जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सायन,नायर,केईएम आणि कुपर रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेत डॉक्टरांच्या वेगवेगळ्या मागण्यांबाबत मध्यस्ती करण्याची मागणी करण्यात आली. कोरोना काळात जास्त काम करुनही वेतनवाढ केली जात नाही. त्याचबरोबर महापालिकेने मार्जच्या डॉक्टरांच्या विद्यावेतनामधून टिडीएस कापू नये अशी मागणी यावेळी मार्डच्या डॉक्टरांकडून करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार आहे. त्याच्यांसमोर मार्डच्या डॉक्टरांच्या सर्व मागण्या मांडणार असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -