घरमुंबईचर्चगेट रेल्वे स्थानकावरील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद

चर्चगेट रेल्वे स्थानकावरील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद

Subscribe

लाखो रुपये खर्च करून पश्चिम रेल्वे मार्गवर कित्येक स्थानकावर उभारलेल्या आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून रेल्वेने उभारलेले हे आपत्कालीन वैद्यकीय केंद्र प्रवाशासाठी बिनकामी ठरत आहे. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेट रेल्वे स्थानकांच्या बाजूला असलेल्या आप्तकाली चिकित्सा कक्ष मागील तीन महिन्यापासून बंद असल्यामुळे रेल्वेच्या कारभारवर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रेल्वे अपघातातील जखमी आणि रेल्वे प्रवासात अचानक प्रवाशांची प्रकृती खराब झाल्यास त्यांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरु करण्याचे निर्देश हायकोर्टने दिले होते. त्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने या आदेशाचे पालन करत रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरु केले होते. यांची जवाबदारी खासगी हॉस्पिटल आणि ओषध निर्माण कंपन्या दिले आहे. मात्र त्यांना सुद्धा हे आपत्काली वैद्यकीय कक्ष चालवणे, आज जळ होत असल्याने अनेकांनी रेल्वे बरोबर झालेला कंत्राट रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आज अनेक रेल्वे स्थानकांवर उभारले गेले आपत्कालीन वैद्यकीय केंद्र धूळ खात पडून आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या बाजूला रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आपत्कालीन वैद्यकीय केंद्र रेल्वेच्यावतीने भाडे तत्वावर दिले होते. यात काही डॉक्टर व नर्सेस मदतनीस प्रवासी रुग्णांच्या सेवेसाठी या कक्षात उपलब्ध होते .

- Advertisement -

तर प्रवाशांना प्राथमिक उपचाराबरोबर, सर्व प्रकारची रक्ततपासणी, ईसीजी, औषधे,तात्काळ रक्त तपासणी, संपूर्ण आरोग्य तपासणी,आदी तापसण्या अल्पदरात उपलब्ध होत्या. मात्र येथे औषधोपचार घेण्यासाठी येणार्‍या प्रवासी रुग्णांची संख्या कमी असल्याने आणि रेल्वे स्थानका बाजूला असल्याने या चिकित्सालयाचे दिवसेंदिवस नुकसान होऊ लागले होते. त्यात साधारणता प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये भाडे, कर्मचार्‍यांचा पगार या सर्व गोष्टी आवाक्याबाहेर जात असल्याने २० जानेवारी २०१९ रोजी सदरील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र अखेर बंद करण्यात आले आहे. मात्र लवकरच हे कक्ष दुसर्‍या एखाद्या ओषध कंपनीला किंवा हॉस्पिटला हस्तांतरित करण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱयांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

रेल्वे वैद्यकीय सुविधा पुरविण्यास अपयशी
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दादररोज ७५ लाख पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करता. मात्र पाहिजे त्या सुविधा देण्यास रेल्वेला अपयश आले आहे. सद्याच्या परिस्थिती पश्चिम रेल्वे मार्गवर ३२ रेल्वे स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र आहे. आपत्कालीन वैद्यकीय केंद्र चालविण्यार्‍यावर रेल्वे प्रशासनाकडून जाचक अटी लादल्यामुळे व पाहिजे त्या सुविधा न दिल्यामुळे रेल्वे स्थानकावर वैद्यकीय केंद्र चालवणे जड झाले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या स्थानकावरील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद होण्याचा मार्गवर आहे.

- Advertisement -

असे आहे भाडे
चर्चगेट स्थानक = १२ लाख
मुंबई सेंट्रल स्थानक = १२ लाख
लोअर परेल स्थानक = ५ लाख
बांद्रा स्थानक = १२ लाख
अंधेरी स्थानक = १२ लाख
बोरिवली स्थानक = ५ लाख

हायकोर्टच्या आदेश असून सुद्धा चर्चगेट रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र मागील ३ महिन्या पासून बंद आहे. रेल्वेनी आपत्कालीन वैद्यकीय केंद्राचा पुन्हा टेंडर काढावा. जेव्हा पर्यत निविदा भरत नाही. तेव्हा पर्यत रेल्वेनी आपला डॉक्टर या आपत्कालीन वैद्यकीय केंद्र ठेवून प्रवाशांना सुविधा द्यावी.
-समीर झवेरी, सामाजिक कार्यकर्ता

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -