घरताज्या घडामोडीतृतीयपंथीयांनी गणवेश फाडून वाहतूक पोलिसाला केली मारहाण

तृतीयपंथीयांनी गणवेश फाडून वाहतूक पोलिसाला केली मारहाण

Subscribe

तृतीयपंथीयांनी वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना मुंबईत घडली. रिक्षा थांबवून कारवाई सुरू असताना त्यांनी पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी चार तृतीयपंथीयांना अटक केली.

मुंबईतील छेडानगर जंक्शनजवळ वाहतूक पोलिसाला चार तृतीयपंथीयांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने रिक्षा थांबवून कारवाई केली असल्यामुळे त्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मारहाण केलेल्या चारही तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली आहे. विनोद सोनावणे (वय ३८) असे मारहाण झालेल्या वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून विक्रोळी वाहतूक शाखेत ते कार्यरत आहेत.

मिळालेल्या महितीनुसार, संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान, सोनावणे हे वाहतूक नियमन करत असताना, एका रिक्षातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेण्यात येत होते. त्यांनी रिक्षा थांबवली आणि ई-चालनाची प्रक्रियेला सुरुवात केली. त्यांनी रिक्षा क्रमांकाचा फोटो काढला. ते फोटो काढत असतानाच, त्याच रिक्षातून प्रवास करणारे चार तृतीयपंथीय खाली उतरले आणि त्यांनी सोनावणे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. चारही तृतीयपंथीयांनी सोनावणे यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच गणवेशही फाडला. लव्हली पाटील नावाच्या तृतीयपंथीयांनी माझी टोपीही काढून फेकून दिली, असे सोनावणे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्यांनी वॉकीटॉकीही फोडून टाकला. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. लव्हली पाटील (वय २७), विकी कांबळे (२६), तनू ठाकूर (२४) आणि जेबा शेख (२४) अशी अटक केलेल्या चारही तृतीयपंथीयांची नावे असून, ते घाटकोपरमधील पंचशीलनगरमधील रहिवासी आहेत.


हेही वाचा – खाद्य तेल उत्पादक, रिपॅकर्सवर अन्न व औषध प्रशासनाची कडक कारवाई

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -