घरमुंबईबेस्टच्या आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

बेस्टच्या आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Subscribe

कोरोनाच्या संसर्गाची भिती असताना गोरेगांव आगारातील बेस्ट बसच्या वाहकाला कोरोनाची लागण

बेस्टच्या विद्युत विभागात काम करणाऱ्या कामगाराचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या संसर्गाची भिती असताना गोरेगांव बेस्ट आगारातील  वाहकाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. बेस्ट उपक्रमातील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत असले तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचेही स्पष्ट होत आहे. मंगळवारी रात्री एस.आर.व्ही रुग्णालयात एका बेस्ट कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

लॉकडाऊन काळात बेस्टचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. आता बेस्ट प्रशासनाने, महानगर पालिका आणि राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहेत. त्यांना सर्व सोयी सुविधा दिल्या पाहिजे. आता बेस्टने पैसे नाही म्हणून हात झटकू नयेत  – सुनिल गणाचार्य, बेस्ट समिती सदस्य

- Advertisement -

दरम्यान, वडाळा बस आगारात फोरमन पदावर कार्यरत असणारे हे पहिले कामगार होते, ज्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर परळ बेस्ट वसाहतीत राहणारे कामगार यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. परंतु काही दिवसांनंतर तिची दुसरी चाचणी केली असता अहवाल निगेटीव्ह आल्याचे पालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते. परंतु अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमातील कामगाराला कोरोनाची लागण झाली आणि नंतर मृत्यू झाला, या बातमीमुळे बेस्ट उपक्रमातील विशेष करुन वाहक व चालकांसह अन्य कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच मीरा रोड येथे राहणारे बेस्टच्या गोरेगाव आगारात वाहक असलेले एक कर्मचारी देखील १० एप्रिल पासून मिरारोड मधील रुग्णालयात दाखल आहेत. तेही कोरोना बाधित असल्याने आता बेस्ट प्रशासनाची चिंता वाढली आहे.


CoronaVirus: बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -