घरCORONA UPDATECoronaVirus: बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण!

CoronaVirus: बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण!

Subscribe

राज्यात कोरोनाची व्हायरस फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. वडाळा बस डेपोतील बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. या कर्मचाऱ्याला एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसंच त्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन राहायला सांगण्यात आले आहे.

मुंबईतील टिळकनगर येथील सील केलेल्या इमारतीत तो राहत होता. सुट्टी झाल्यानंतर हा कर्मचारी शुक्रवारी कामावर दाखल झाला होता. मात्र कोरोनाची लागण झाल्यामुळे आता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सुट्टी दरम्यान तो कोठे गेला होतो आणि त्याच्या संपर्कात किती जण आले होते याचा शोध घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

इंडिया कोविड-१९ ट्रॅकरच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत राज्यात कोरोनाचे ४२३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ हजार ५७९ पोहोचली आहे. यापैकी ७३ जणांचा बळी गेला आहे.

आतापर्यंत देशभरातील कोरोनाची आकडेवारी

महाराष्ट्र – ४२३
तमिळनाडू – ३०९
दिल्ली – २९३
केरळ – २८६
तेलंगणा – १५४
आंध्रप्रदेश – १६१
राजस्थान – १५४
उत्तर प्रदेश – १२६
कर्नाटक – १२४
मध्यप्रदेश – १०७
गुजरात – ८८
जम्मू-काश्मीर – ७०
पश्चिम बंगाल – ५३
हरयाणा – ४९
पंजाब – ४७
बिहार – २९
चंदीगढ – १८
आसाम – १६
लडाख – १३
अंदमान-निकोबार – १०
उत्तराखंड – १०
छत्तीसगड – ९
हिमाचल प्रदेश – ६
गोवा – ६
ओडिसा – ५
पाँड्युचेरी – ५
झारखंड – २
मनिपुर – २
मिझोरमा – १
अरुणाचल प्रदेश – १
एकूण – २५७९

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus Live Update: गोव्यात आणखीन एक कोरोना पॉझिटिव्ह!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -